जम्मू कश्मीर: दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणेतील जवानांमध्ये चकमक; 2 जवान शहीद
Jammu and Kashmir. (Photo Credits: IANS|File)

जम्मू कश्मीर (Jammu Kashmir) मध्ये आज सकाळी अवंतिपोरा (Awantipora) भागामध्ये स्थानिक पोलिस, सुरक्षा अधिकारी यांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये 2 दहशतवादी ठार झाले आहेत. तर या चकमकीमध्ये दोन भारतीय जवानदेखील शहीद झाले आहेत. दरम्यान सध्या गोळीबार थांबला असून स्थिती नियंत्रणामध्ये आहे. जम्मू कश्मीर मध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार.  

आज सकाळी अवंतिपोरा मधील सातपोखनर मध्ये ही चकमाक झाली. सुरक्षापथकांना आज दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घराला घेराव घातला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. दरम्यान अतिरिक्त सुरक्षा पथकाच्या मदतीने सारी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

ANI Tweet  

काल पुलवामा मध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते त्यानंतर ही चकमक झाली. यामध्ये जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तिघांना कंठस्नान घालण्यामध्ये यश आले होते.