Assam, West Bengal Election 2021: (Photo Credits-ANI)

West Bengal-Assam First Phase Voting: पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता सुरुवात झाली आहे. बंगाल मध्ये 5 जिल्ह्यातील 30 विधानसभेच्या जागांसाठी तर आसाममध्ये 47 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. बंगालमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याचसोबत आसाममध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मत देता येणार आहे. निवडणूक आयोगाने यंदा मतदानाची वेळ वाढवून दिली आहे.(CM Mamata Banerjee on PM Narendra Modi: फक्त दाढीच वाढते आहे, स्टेडीयमलाही आपलेच नाव दिले; ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात)

पश्चिम बंगाल बद्दल बोलायचे झाल्यास पहिल्या टप्प्यात बांकुरा, पुरुलिया, झारग्राम, पश्चिमी आणि पूर्व मिदनापुर जिल्ह्यातील 30 जागांवर आज मतदान होणार आहे. या 30 जागांवर पटाशपुर, भगवानपुर, खेजुड़ी, कांथी उत्तर, कांथी दक्षिण, एगरा, रामनगर, बिनपुर, गोपीबल्लभपुर, झारग्राम, नयाग्राम, केशियरी, गड़बेता, सालबनी, खड़गपुर, मेदिनीपुर, दांतन, बंदवान, बलरामपुर, जयपुर, पुरुलिया, बाघमुंडी,मानबाजार, पारा, रघुनाथपुर, काशीपुर, सालतोरा, रानीबांध, रायपुर आणि छातना मध्ये मतदान होणार आहे.

Tweet:

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. या जागांसाठी आठ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यानुसार 27 मार्च, 1 एप्रिल, 6 एप्रिल, 10 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 29 एप्रिलला मतदान होणार आहे. तर येत्या 2 मे रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.(राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा; NHAI पुढील 5 वर्षांत उभारत आहे 600 Wayside Amenities)

आसाम बद्दल बोलायचे झाल्यास शनिवारी येथे 47 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. येथे विधानसभेच्या 126 जागा असून त्यापैकी 47 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान केले जाणार आहे. यावरील जागा आसाम आणि ब्रम्हपुत्राच्या उत्तरी किनाऱ्यावरील 12 जिल्ह्यामधील आहेत.