स्मृती इराणी आणि आशा भोसले (Photo Credits-Twitter)

गुरुवारी (30 मे)  दिल्ली (Delhi) येथे राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच अनेक दिग्गज मंडळींना या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. त्यावेळी प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांनी उपस्थिती लावली होती.

शपथविधी सोहळ्याला अमेठी मधून विजयी झालेल्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी सुद्धा उपस्थिती लावला. दरम्यान आशा भोसले यांनी स्मृती इराणी यांच्या विजयासाठी अनेक कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र खासकरुन शपथविधी सोहळा संपल्यानंतर निघणाऱ्यांची गर्दी फार प्रमाणात झाली होती. त्यामध्ये आशा भोसले या गर्दीत अडकल्या होत्या. परंतु स्मृती इराणी यांनी पुढे जात आशा भोसले यांना गर्दीतून सुखरुप बाहेर काढले.(Modi Cabinet Full List of Ministers: पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर; ज्येष्ठांची खांदेपालट, नव्या चेहऱ्यांवर मोठी जबाबदारी; एका क्लिकवर जाणून घ्या कोणाकडे कोणते खाते?)

याबद्दल आशा भोसले यांनी ट्वीट करत स्मृती इराणी यांचे आभार मानले आहेत. तसेच एवढ्या गर्दीतून मी एकटी पडली असता स्मृती इराणी यांनी मदतीचा हात पुढे देऊ केला. त्याचसोबत मी घरी सुखरुप पोहचेन याची खात्री केली. तर स्मृती इराणी यांच्या याच काळजी करण्याच्या स्वभावामुळे त्यांचा विजय झाला असल्याचे आशा भोसले यांनी म्हटले आहे.

काल पार पडलेल्या शपथविधीनंतर स्मृती इराणी यांना महिला आणि बालकल्याण खाते संभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शपविधी वेळी स्मृती इराणी, अमित शहा आणि नितिन गडकरी यांच्यासाठी कडकडून टाळ्या वाजवण्यात आल्या होत्या.