Senior BJP Leader, Former Union Finance Minister Arun Jaitley | (Photo Credits: PTI)

भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली (Arun Jaitley) यांची प्रकृती आणखीनच खालावली असून त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टम (Life support System) वर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येतय. एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अरुण जेटली यांची प्रकृती खालावल्याचे कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) भूटान दौ-यावरुन परतताच त्यांची भेट घेतली. 9 ऑगस्टला अरुण जेटलींना एम्समध्ये दाखल करण्यात आलं.

अरुण जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करताच अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना भेटण्यासाठी जवळपास रिघच लावली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकैया नायडू तसेच भाजप पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी जेटलींची भेट घेतली होती. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देखील जेटलींची भेट घेतली आहे. रुग्णालयात उपस्थित होते.

हेही वाचा- Arun Jaitley Health Update: अरुण जेटली यांची प्रकृती अजूनही गंभीर, अरविंद केजरीवाल व मोहन भागवत यांनी घेतली भेट

9 जेटलींना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.12 आणि 13 ऑगस्टला व्हेंटिलेटर काही काळासाठी काढण्यात आला होता, पण तब्येतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटर लावण्यात आला.

काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. आरोग्याच्या तपासणीसाठी फेब्रुवारी मध्ये त्यांनी यूएस मध्येही काही काळ घालवला होता.