AI ची कमाल! यूपीमध्ये सरकारी परीक्षेत बसले डमी उमेदवार; चेहरा ओळखण्याचे सॉफ्टवेअर वापरून फसवणूक केल्याप्रकरणी 87 जणांना अटक
Artificial Intelligence | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (Artificial Intelligence) यूपी पोलिसांना (UP Police) खूप मदत केली आहे. प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चेहरा ओळखण्याचे सॉफ्टवेअर वापरून, उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पर्धा परीक्षांमधील 87 संशयित कॉपीकॅट पकडले आहेत. या कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअरचा उपयोग करून उत्तर प्रदेश पोलिसांना राज्यातील विविध सरकारी भरती परीक्षा केंद्रांवर परीक्षेत बसलेल्या 87 संशयित फसवणूक करणाऱ्यांना अटक केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, लखनौमधून सर्वाधिक 11 संशयितांना अटक करण्यात आली आहे. गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबाद जिल्ह्यात अशा 12 लोकांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मूळ उमेदवारांऐवजी चुकीच्या पद्धतीने परीक्षा देणारे आणि परीक्षेत फसवणूक करणाऱ्यांचा समावेश आहे, ज्यांना डमी उमेदवार म्हटले जाते. उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाकडून ग्राम विकास अधिकारी पदासाठी मंगळवारी ही परीक्षा घेण्यात आली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाने संपूर्णपणे परीक्षेची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न केला. सर्व केंद्रांवर परीक्षेशी संबंधित उपक्रमांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कमिशन स्तरावर करण्यात आले. यामध्ये प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता चेहरा ओळखण्याचे सॉफ्टवेअर आणि विशेष टास्क फोर्सच्या मदतीने मंगळवारी 87 फसवणूक करणाऱ्या लोकांना पकडले गेले.'

सर्वाधिक लोक लखनौमधून पकडले गेले, त्यानंतर बांदा (10), अलीगढ (8), कानपूर (8), वाराणसी (8), गाझियाबाद (7), गोरखपूर (6), आझमगड (5), गौतम. बुद्ध नगर (5), मिर्झापूर (5), आग्रा (4), झाशी (4), बस्ती (2) आणि बरेली, मेरठ, प्रयागराज आणि मुरादाबादमध्ये प्रत्येकी एक ताब्यात घेतला गेला. (हेही वाचा: AI Impact On Humanity Survey: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मानवता नष्ट करण्याचा धोका, CEO Summit सीईओंचा दावा)

नोएडाच्या इकोटेक-3 पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक सुनील दत्त यांनी सांगितले की, 27 जून रोजी हबीबपूर गावातील सालकराम इंटर कॉलेजमध्ये परीक्षा घेतली जात होती, जिथे प्रत्यक्ष उमेदवाराऐवजी दुसरी व्यक्ती परीक्षा देत होती. परीक्षार्थी दीपक कुमार याने परीक्षेच्या पेपरमध्ये छेडछाड केल्याचा आणि त्याच्या जागी मनीष चौधरी नावाचा व्यक्ती परीक्षा देत असल्याचा आरोप केला जात आहे. दीपकच्या जागी परीक्षा देत असलेल्या मनीष चौधरीला अटक करण्यात आली आहे.