Article 370 रद्द; आता महाराष्ट्र सरकार कश्मीर, लद्दाख मध्ये MTDC Resorts उभारणारण्याच्या तयारीत
MTDC (Photo Credits: Twitter)

जम्मू कश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर देशवासीयांना सरकारचं कौतुक करत या निर्णयाचं स्वागत केल्याचं चित्र आहे. कलम 370 आणि कलम 35A हटवल्यानंतर जम्मू कश्मीर आणि लद्दाख हे भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कश्मीरची भौगोलिक स्थिती बदलल्यानंतर आता अनेक बदल होणार आहेत. नव्या कश्मीरमध्ये आता जमीनीची विक्रीवरील बंधनं उठवल्याने पर्यटकांना कश्मीरचं सौंदर्य न्याहाळण्याची अधिक संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळ आता जम्मू कश्मीर आणि लद्दाख मध्ये MTDC रिसॉर्ट सुरू करण्याच्या विचारात आहेत.

जयकुमार रावल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसीही जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये रिसॉर्ट उघडणार आहे. जम्मू कश्मीर आणि लद्दाख मध्ये उपराज्यपालांची नियुक्ती झाल्यानंतर जमीन खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता काश्मीरमध्ये परराज्यातील व्यक्ती गुंतवणूक करतील, त्याचबरोबर बाजारपेठही खुली होईल. या सगळ्यात महाराष्ट्र पर्यटन महामंडळ मागे राहणार नाही. अशी प्रतिक्रिया जयकुमार रावल यांनी दिली आहे.

कश्मीरमध्ये 3आणि 4 स्टार सोयीसुविधांनी सज्ज रिसॉर्ट उभारण्याची एमटीडीसीची योजना आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांची उत्कृष्ट रिसॉर्ट्स आहेत. कश्मीर हे भारताचं नंदनवन असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे कायमचं या ठिकाणाला भेट देण्याची पर्यटकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. पर्यटकांचा हा कल लक्षात घेता एमटीडीसीचा नवा प्लॅन आहे.

जम्मू कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवल्यानंतर आता संचारबंदीचं कलम 144 रद्द करण्याची तयारी सुरू आहे. आज संध्याकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.