आपल्या चारचाकी वाहनाचे अच्छादन फाडले यामुळे संतप्त झालेल्या एका जोडप्याने धारधार शस्त्राने भोसकून कुत्र्याची हत्या केली आहे. हरभजन सिंह असे आरोपीचे नाव आहे. ही घटना पंजाबमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी (PAU) पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले इन्स्पेक्टर राजिंदर सिंग यांनी दशमेश नगर येथील रहिवासी हरभजन सिंग आणि त्याची पत्नी यांच्याविरुद्ध मणि सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. दोखल गुन्ह्याम्ये भारतीय दंड संहिता (IPC) आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलमांचा समावेश आहे.

पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. मात्र, आरोपी सध्या फरार झाला आहे. आरोपी धक्कादायक कृत्य करताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. धारधार शस्त्राने भोसकण्यापूर्वी आरोपी कुत्र्याला काठीने बदडतानाचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते आहे. भटक्या कुत्र्यांवर झालेला क्रूर हल्ल्याचा प्राणिमित्रांनी निषेध केला आहे. (हेही वाचा, Dog Meat Banned: साऊथ कोरिया मध्ये कुत्र्याच्या मांस विक्री वर बंदीचा निर्णय संसदेमध्ये पारित)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)