Leopard killed by frenzied locals in Guwahati | (Photo Credits: YouTube/Screengrab)

मागील अवघ्या आठवड्याभरात भारतात प्राण्यांवरील अत्याचाराच्या तब्बल तीन घटना समोर आल्या आहेत, यातच आता भर म्हणून एक नवं आणि अत्यंत भीषण प्रकरण उघडकीस आले आहे. केरळ (Kerala) मधील हत्तीणीला फटाके भरलेला अननस खाऊ घालण्यापासून ते औरंगाबाद (Aurangabad) मध्ये कुत्र्याला स्कुटीमागे साखळीने बांधून फरफटत नेणे, ते हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मध्ये गाभण गायीला स्फोटके खाऊ घालणे असे काही प्रकार घडल्यावर आता आसाम (Assam)  मध्ये चक्क एका चित्त्याला (Leopard Killed)  गावकऱ्यांनी मारहाण केल्याचे समजत आहे. यामध्ये या मुक्या प्राण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी मारहाण केल्याने मृत्यू पावलेल्या या प्राण्याच्या मृत शरीराला सुद्धा त्रास देण्यात हे गावकरी मागे राहिले नाहीत,या प्राण्याच्या शवासोबत त्यांनी संपूर्ण गावात परेड काढल्याचे समजत आहे. या घटनेचा एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. जर का तुम्ही मजबूत हृदयाचे असाल तरच हा व्हिडीओ पहा.

Himachal Pradesh: गर्भवती गायीला फटाके चारणाऱ्या व्यक्तीला अटक; गायीने नुकताच दिला वासराला जन्म मात्र जबडा तुटून गेल्याने अजूनही प्रकृती गंभीर

प्राप्त माहितीनुसार हा व्हिडीओ आसाम मधील कताबरी या भागातील आहे. हा परिसर जंगलांसाठी राखीव आहे. या गावात काही दिवसांपूर्वी एका चित्त्याला फिरताना पाहायला मिळाले होते, यानंतर गावकऱ्यांनी एक जाळे टाकून या चित्त्याला अडकवले. यानंतर जलायत अडकवलेल्या प्राण्याला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. त्याने अखेरीस जीव सोडल्यावर गावकऱ्यांनी त्याचे दात आणि नखं सुद्धा तोडून काढली. यांनतर याच मृत शरीराला घेऊन गावभर धिंड काढण्यात आली यात गावकरी या प्राण्याला उचलून उडवताना पाहायला मिळत आहेत.

मृत चित्ता हातात घेऊन गावकऱ्यांची परेड (Watch Video)

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील ६ जणांना लगेचच अटक केली आहे. यातील एक जण हा अल्पवयीन आहे.या व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसत असणाऱ्या बाकीच्यांची सुद्धा चौकशी सुरु आहे, यात दोषी आढळून आलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.औरंगाबाद: गळ्याला साखळी बांधून कुत्र्याला 1 किमी पर्यंत फरफटत नेल्याच्या व्हिडिओ समोर; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आसाम पोलिस ट्विट

दरम्यान, या एकूण प्रकरणावर भारतीय जनता पक्षाचे आसाम मधील विधानसभा सदस्य आणि राज्याचे वनमंत्री परिमल शुक्लबैद्य यांनी खेद व्यक्त केला आहे. दोषींना लवकरात लवकर पकडून कारवाई केली जाईल असा विश्वाशी परिमल यांनी व्यक्त केला आहे.