Image of cattle used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) एका गर्भवती गायीला (Pregnant Cow) स्फोटके दिल्याने तिचा जबडा उद्ध्वस्त होऊन ती गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांंनी दिलेल्या माहितीनुसार, गायीची अवस्था अजूनही नाजूक आहे, कालच तिने एका वासराला जन्म दिला आहे. सुदैवाने वासराची प्रकृती व्यवस्थित आहे, मात्र गायीच्या जबड्याची वरची आणि खालची दोन्ही हाडे तुटून उडून गेल्याने अंतर्गत भीषण जखमा झाल्या आहेत. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील बिलासपुर (bilaspur) भागात राहणार्‍या गुररुदयाल सिंग नावाच्या गाईच्या मालकाने आपल्या गायीच्या या अपघातासाठी शेजार्‍यावर संशय व्यक्त केला होता,यानुसार काल या शेजार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद: गळ्याला साखळी बांधून कुत्र्याला 1 किमी पर्यंत फरफटत नेल्याच्या व्हिडिओ समोर; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संशियत आरोपीने चौकशी दरम्यान सांगितल्यानुसार, अनेकदा आपल्या शेतात जंगली जनावरे आक्रमण करतात त्यांना भीती दाखवण्यासाठी कुरणांच्या बॉर्डरवर फटाके ठेवले होते, मात्र हेच फटाके नेमके गायीने खाल्ले आणि हा अपघात झाला. यामागे कोणताही पूर्वनियोजित कट नव्हता. मात्र याबाबत पोलीस अजूनही तपास करत आहेत. प्राण्यांना फटाके खाऊ घालण्यासाठी संशियत आरोपी नंदलाल याच्यावर IPC आणि कलम 11 अंतर्गत प्राण्यांवर अत्याचार करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी त्याला मोठी शिक्षा सुद्धा होउ शकते. हा सर्व प्रकार २५ मे रोजी घडला होता.

ANI ट्विट

दरम्यान, मागील काहीच दिवसात प्राण्यांवरील अत्याचाराची हि तिसरी घटना आहे. यापूर्वी केरळ मध्ये पलक्कड या भागात एका गरोदर हत्तीणीला अन्नसातून फटाके खाऊ घातल्याने तिचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता, तर त्यानंतर महाराष्ट्रात कुत्र्याला गळ्यात साखळी बांधून जवळपास 1  किमी पर्यंत फरफटत नेण्याची घटना समोर आली होती. या लागोपाठ घटनांमुळे आता मुक्या प्राण्यांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.