औरंगाबाद: गळ्याला साखळी बांधून कुत्र्याला 1 किमी पर्यंत फरफटत नेल्याच्या व्हिडिओ समोर; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Dog | Representational Image | (Photo Credit: Pexels)

प्राण्यांना अमानुष वागणूक देण्याची अजून एक घटना महाराष्ट्रातील (Maharashtra) औरंगाबाद (Aurangabad) येथून समोर आली आहे. एका कुत्र्याच्या गळ्यात साखळी अडकवून बाईकला बांधून 1 किमी पर्यंत फरफटत नेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओत कुत्र्याच्या मानेला साखळी अडकून बाईकला बांधून फरफटत नेताना दिसत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अशा प्रकारची अजून घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगढ (Aligarh) येथून समोर आली. एका कुत्र्याला काही लोकांनी बेदम मारण्याचा व्हिडिओ समोर आला होता. या मारहाणीत त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. एसपी अतुल शर्मा (SP Atul Sharma) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना छर्रा (Chharra) पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. या प्रकरातील दोषींचा शोध सुरु आहे. लवकरच त्यांच्या विरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल.

केरळमधील गर्भार हत्तीणीला अमानुषपणे मारल्याची घटना 27 मे रोजी समोर आली. गर्भार हत्तीणीला फटाके भरलेले अननस खायला दिल्याने तिचा मृत्यू झाला. फटाकांच्या स्फोटामुळे हत्तीणच्या जबड्याला मोठी जखम झाली होती. तिचा दातही तुटला होता. असह्य वेदना सहन न झाल्याने वेलियार नदीत उभे राहून ती सतत पाणी पित राहिली आणि या वेदनेसह तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती केरळचे वनमंत्री के. राजू यांनी 5 जून रोजी दिली आहे. (लज्जास्पद! गवत चरणाऱ्या गरोदर गायीच्या तोंडात फटाके फोडले, हिमाचल प्रदेश मधील धक्कादायक घटना)

ANI Tweet:

या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले असून सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. किक्रेटपटू विराट कोहली, रोहित शर्मा, हरभजनसिंह यांच्यासह अनेकजण यावर व्यक्त झाले आहेत. तर मराठी सिनेसृष्टीतूनही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. ही घटना ताजी असतानाच हिमाचल प्रदेशमध्ये गर्भार गाईला फटाके खायला दिल्याची अमानुष घटना समोर आली होती.