लग्नाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यामध्ये नववधू आणि वराची संपूर्ण माहिती कळल्याशिवाय घरातील मंडली विवाहासाठी मान्यता देत नाही. त्याचसोबत काही समाजात रुढीपरंपरांगत सुरु असलेल्या विवाहपद्धतीमुळे काही वेळा लग्न मोडल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु आंध्रप्रदेशात अशी एक घटना घडली आहे की, त्यामध्ये आधार कार्डवरील एका फरकामुळे चक्क नववधूचे लग्न मोडले आहे.
गंटुर जिल्हात एका तरुणाचे गावातील शेतकरी मुन्नंगी वेंकट रेड्डी यांच्या मुलीसोबत लग्न ठरवण्यात आले होते. लग्नाच्या सर्व विधीसुद्धा पार पडल्या आणि दोघांनी एकमेकांसोबत राहण्याची शपथसुद्धा घेतली. परंतु लग्नामधील सर्व विधीपार पडल्यावर विवाहाची नोंदणी करण्यासाठी मुलीचे आधारकार्ड मागितले. त्यावेळी मुलीच्या आडनावात थोडा फरक होता. याच कारणामुळे संतप्त झालेला नवरदेव तेथून निघून गेला. तसेच मुलीच्या घरातील मंडळींना आम्हाला फसवल्याचा आरोप लगावण्यात आला.
(झारखंड मध्ये लग्नात पाणीपुरी खाण्यावरून वऱ्हाड्यांमध्येच जुंपली, हाणामारीत एकाचा मृत्यू)
तर मुलीच्या आधार कार्डावर रेड्डी असे आडनाव नव्हते. यामुळे दोघांच्या परिवारात वादावादी ऐवढी झाली की प्रकरण थेट पोलिसात पोहचले. त्याचसोबत पोलिसात धाव घेतलेल्या मुलीच्या परिवाराने न्याय मिळावा अशी मागणी केली. तर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपासणी सुरु आहे. मात्र मुलाने आणि त्याच्या परिवातील मंडळींनी पळ काढला आहे.