झारखंड मध्ये लग्नात पाणीपुरी खाण्यावरून व-हाड्यांमध्येच जुंपली, हाणामारीत एकाचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : pixabay)

पाणीपुरी कोणाला आवडत नाही अस होणारच नाही. त्यामुळे कोणत्याही समारंभात जर पाणीपुरी (PaniPuri) हा मेन्यू असेल तर लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र एका लग्नसोहळ्यात ह्याच आनंदाचे रुपांतर हाणामारीत होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐकून धक्का बसला ना पण हे खरे आहे. झारखंडमधील बाघमारा गावात एका लग्नसोहळ्यात व-हाड्यांमध्ये चक्क पाणीपुरी खाण्याच्या वादावरून जुंपली. यात जवळपास 50 लोकांच्या झालेल्या बाचाबाचीत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

आज तक ने दिलेल्या बातमीनुसार, झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील बाघमारा गावात एका लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात पाणीपुरी हा मेन्यू ठेवण्यात आला होता. अचानक तेथे आलेल्या व-हाड्यांमध्ये पाणीपुरी खाण्यावरुन बाचाबाची सुरु झाली. त्याचे बाचाबाची रुपांतर इतके गंभीर झाले की, तेथील जवळपास 50 लोक यात सामील झाले. त्यात एक व्यक्ती देखील दगावला. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव दिलीप दास असे आहे.

संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको करत तोडफोड करायला सुरुवात केली आहे. घटनेचे गंभीर स्वरुप लक्षात घेता लवकरच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा-पाणीपुरी खाण्याचे हे आहेत आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

दिलीप दास यांच्या मृत्यूमुळे वधू पक्षावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या निषेधार्थ लोकांनी रास्ता रोको करत दुकानांची तोडफोड करायला सुरुवात केली. पोलिसांनी तात्काळ दोषींना ताब्यात घेऊन या घटनेविषयी अधिक तपास करत आहेत.