Anant Chaturdashi 2021 HD Images: अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा Greetings, WhatsApp Status, Quotes द्वारा शेअर करत आप्तांसाठी करा भक्तीमय दिवस!
अनंत चतुर्दशी । File Image

Happy Anant Chaturdashi 2021: गणेशोत्सवाची सांगता होणारा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi). महाराष्ट्रात भाद्रपद शुद्ध चतुर्दशी दिवशी 10 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याची पद्धत आहे. त्यामुळे गणरायाच्या नामघोषात, नाचत-गात मोठ्या उत्साहाने बाप्पाला अनंत चतुर्दशी दिवशी निरोप दिला जातो. यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सणाला धामधूमीचा रंग नाही. गर्दी टाळत अत्यंत साधेपणाने बाप्पाला यंदा निरोप देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण यंदा तुम्ही गणेशभक्तांना रस्त्यात मिरवणूकांमध्ये भेटून शुभेच्छा देऊ शकत नसलात तरीही सोशल मीडीयामध्ये मराठामोळे मेसेजेस (Ganpati Visarjan Messages), गणरायाची घोषवाक्य, Quotes, बाप्पाच्या विसर्जनाचे  स्टेटस (Ganesh Visarjan Status) शेअर करत गणपती बाप्पाचा निरोप घ्या.

महाराष्ट्रात बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जशी मोदकांची दावत असते तसेच बाप्पाच्या निरोपाला देखील मोदक बनवले जातात. अनंत चतुर्दशी दिवशी देखील नैवैद्याला, शिदोरीला मोदक करण्याची प्रथा आहे. (नक्की वाचा: Anant Chaturdashi 2021 Visarjan Muhurat: अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी दिवसभरातील पहा कोणत्या आहेत शुभ वेळा?).

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा

अनंत चतुर्दशी । File Image
अनंत चतुर्दशी । File Image
अनंत चतुर्दशी । File Image
अनंत चतुर्दशी । File Image
अनंत चतुर्दशी । File Image

 

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी असे दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर त्याला निरोप देण्याचा क्षण प्रत्येक गणेशभक्तासाठीच कठीण असतो. पण बाप्पा पुढल्या वर्षी पुन्हा येणार आहे या आशेवर त्याला अनेकजण अलविदा म्हणत असतात. यंदा कोविड च्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी घरच्या घरी कृत्रिम तलावात बाप्पाला अनेकजण निरोप देणार आहेत. त्यामुळे तुमच्या नातेवाईकांना प्रियजणांना यंदा व्हर्च्युअल माध्यमातून बाप्पाच्या विसर्जनाला समाविष्ट करून घ्या आणि हा आनंदाचा सण भक्तिमय वातावरणामध्ये सुरक्षितपणे साजरा करा.