सामान्य माणसाला दिवसेंदिवस वाढत्या महागाईचा फटका बसत आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याभराचे बजेट सुद्धा कोलमडले जात आहे. कांद्याच्या किंमती वाढल्यानंतर आता लगेच दुधाच्या किंमतीत सुद्धा वाढ करण्यात आली आहे. अमूल दूध आजपासून महागले आहे. तर मदर डेयरी यांनी त्यांच्या विविध प्रकारच्या दुधाच्या किंमतीत 3 रुपयांनी वाढ केली आहे. अमूलने त्यांच्या दुधाचे दर 2 रुपये लीटर पर्यंत वाढवले आहे. तर दुधाचे वाढीव दर राज्यात आजापासून लागू झाले आहेत.
मदर डेयरी यांनी टोकन आणि पिशवी मधील दुधाचे दर 2 ते 3 रुपये प्रति लीटर पर्यंत वाढवले आहेत. त्याचसोबत अमूल कंपन्याच्या नावाने विकले जाणारे डेयरी उत्पादन यांनी असे म्हटले आहे की, गुजरात मधील अहमदाबाद, दिल्ली-एनसीआर. पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासह मुंबई येथे दुधाचे दर 2 रुपये प्रति लीटरने वाढवले आहेत. तर जीसीएमएमएफ देशभरात प्रतिदिन 1.4 करोड लीटर दुधाचा पुरवठा करतात. त्यामधील 33 लाख लीटर दिल्ली-एनसीआर येथे पुरवले जाते. मदर डेअरी दिल्ली-एनसीआर मध्ये 30 लाखापेक्षा दुधाचा पुरवठा करतात. दोन्ही कंपन्यांच्या वाढलेले दर हे कच्च्या दुधाच्या खरेदी किंमतीत वाढ झाल्याचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत दुध विक्री करुन येणारा पैसा हा जवळजवळ 80 टक्के फक्त खरेदी करण्यात खर्च होतो.(चहामध्ये साखर वापरण्यापेक्षा मध का उत्तम? जाणून घ्या कारण)
दुधाचे नवे दर आजपासून राज्यभरात लागू झाले आहेत. तर मदर डेयरीचे टोकन दुध आता 2 रुपयांनी महागले असून 42 रुपये प्रति लीटर झाले आहे. फुल क्रीम दूधाची एक लिटरची पिशवी 55 रुपये, अर्धा लीटर 28 रुपयांत मिळणार आहे. टोन्ड दुध 45 रुपये लीटर आणि डबल टोन्ड दुध 36 रुपयांऐवजी 39 रुपये प्रति लीटरला मिळणार आहे. याप्रकारे गायीचे दुध 3 रुपयांनी महागले असून 47 रुपये झाले आहे. अमूल गोल्ड आणि अमूल ताजा यांचे दर 2 रुपयांनी वाढवले असून ग्राहकांना 55 आणि 44 रुपये क्रमश: मोजावे लागणार आहेत. अमूल दुधाचे दर 42 रुपयांवरुन 44 रुपये प्रति लीटर झाले आहे.