कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर जगभरात अनेक देशात लॉक डाऊन (Lock Down) जाहीर करण्यात आले आहे. भारतातही अनेक सरकारी सुविधा सुद्धा या कारणास्तव काही दिवस बंद असतील. यामध्ये नागालॅन्ड सरकार (Nagaland State Lottery Result) प्रस्तुत लॉटरी संबाद चा सुद्धा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार डियर लॉटरीज मधील सर्व राज्यांच्या लॉटरी या 23 मार्च पासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत lotterysambadresult.in या अधिकृत वेबसाइटवरून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. Coronavirus: देशातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 562, चाळीस रुग्ण उपचारानंतर बरे, 9 जणांचा मृत्यू.
डियर लॉटरी ही नागालॅन्ड किंवा सिक्कीम सरकार प्रस्तुत असली तरीही महाराष्ट्रातील नागरिकांनादेखील या डियर विकली लॉटरीजचं तिकीट काढता येऊ शकतं. सोबतच ही लॉटरी देखील जिंकण्याची संधी असते. दरम्यान या डियर लॉटरी तिकिटांपैकी काही तिकीटं ही महाराष्ट्र राज्यापुरता राखीवदेखील ठेवली जातात. त्यामुळे डियर लॉटरीची तिकीट सरकारच्या अधिकृत लॉटरी विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात. मात्र आता पुढील काही दिवस तरी या लॉटरीजची विक्री बंद ठेवली जाणार आहे. महाराष्ट्राच्या शिवाय, पश्चिम बंगाल, केरळ, नागालँड, सिक्कीम या राज्यात सुद्धा ही लॉटरी चालवण्यात येते.
दरम्यान, डियर लॉटरीचे तिकीट हे केवळ 6 रुपयात येत असून त्यातून 1 कोटींची मोठी बक्षिसी रक्कम जिंकण्याची संधी असते. आठवड्यातून ही लॉटरी तीन दा जाहीर करण्यात येते. कोरोनामुळे सध्या व्यवसाय क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या देशात 500 हुन अधिक रुग्ण असल्याने परिस्थिती गंभीर आहे आणि हीच परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पुढील 21 दिवस लॉक डाऊन आले आहे, याबाबत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत घोषणा केली आहे.