Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

अलिगढ (Aligarh) मधील एक धक्कादायक बाब सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. 2015 साली अपहरण आणि खून करण्यात आलेली मुलगी आता अचानक जिवंत असल्याचं समोर असल्याने पुन्हा पोलिस तपासाला वेग आला आहे. अलिगड पोलिसांनी (Aligarh Police) या प्रकरणी पुन्हा तपास सुरू केला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार तेव्हा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेली मुलगी आता हाथरस मध्ये असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांकडून या दाव्याचा पुन्हा तपास करत आहेत. दरम्यान या अपहरण आणि खून प्रकरणात आरोपी जेल मध्ये शिक्षा भोगत आहे. आता ती मुलगी 21 वर्षीय झाली असून पोलिसांकडून तिचं डीएनए प्रोफलिंग केले जाणार आहे. याच्या द्वारा ती मुलगी खरंच जिवंत आहे का? हे पोलिस तपासणार आहेत.

 DNA च्या वृत्तानुसार,  सध्या तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीच्या कुटुंबियांनी अलिगढ पोलिसांना ज्या मुलीच्या खूनासाठी तो जेलमध्ये आहे ती हाथरसमध्ये 2 मुलांची आई बनून संसार करत असल्याची बाब लक्षात आणून दिली आहे. ही मुलगी गायब होती तेव्हा 14 वर्षांची होती. नंतर तिचा मृतदेह सापडल्याचा दावा करण्यात आला. तिच्या वडिलांनीच मृतदेहाची ओळख पटवली होती.

पोलिसांनी आता या 21 वर्षीय तरूणीला हाथरस मधून अलिगढ मध्ये बोलावले आहे तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे. इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना पोलिसांनी मुलीचं डीएनए प्रोफाईलिंग करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. याच्या माध्यमातून तिच्या वडीलांनी तेव्हा ओळख पटवलेली मुलगी आणि ही मुलगी सारखीच आहे का? याची देखील पडताळणी होईल. नक्की वाचा: Visakhapatnam Shocker: विशाखापट्टणम मध्ये ड्रम मध्ये आढळले महिलेच्या शरीराचे प्लॅस्टिक बॅगमध्ये कोंबलेले तुकडे; 18 महिन्यांनी प्रकाशझोतात आलं हत्याकांड .

जर मुलीची ओळख पटली तर पोलिस कोर्टात जाऊन आरोपी विरूद्धचे गुन्हे मागे घेण्यासाठी कार्यवाही सुरू करतील. 2015 मध्ये मुलीच्या कुटुंबाने ती हरवल्याची तक्रार केली होती. तिचे वडील आग्राला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी गेले होते. या मुलीच्या अपहरण आणि खून प्रकरणामध्ये तिच्याच शेजारी राहणारा, कामगार मुलगा आरोपी म्हणून अटक करण्यात आला होता.

3 वर्षांनंतर आरोपीला जेलमधून जामीनावर सोडण्यात आले होते पण कोर्टाच्या कार्यवाहीत सहकार्य करत नसल्याचं सांगत पोलिसांनी पुन्हा त्याला अटक केली आहे.