Visakhapatnam Shocker: विशाखापट्टणम मध्ये ड्रम मध्ये आढळले महिलेच्या शरीराचे  प्लॅस्टिक बॅगमध्ये कोंबलेले तुकडे; 18 महिन्यांनी प्रकाशझोतात आलं हत्याकांड
Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

दिल्लीत काही दिवसांपूर्वी 6 महिन्यांपूर्वी हत्या केलेल्या लिव्ह इन पार्टनरच्या खूनाची कहाणी चर्चेत आहे. त्यानंतर आता अशाच अंदाजातील अजून एक हत्याकांड समोर आलं आहे. आंध्र प्रदेशात  एका 35 वर्षीय महिलेचा अर्धवट डिकम्पोज्ड अवस्थेमधील मृतदेह सोमवारी पोलिसांना आढळला आहे. एका प्लॅस्टिक बॅगेमध्ये महिलेच्या शरीराचे तुकडे करून ते कोंबलेल्या अवस्थेमध्ये ड्रममध्ये आढळले आहेत. ही घटना विशाखापट्टणम मधील Madhurawada येथील Vikalangula colony मधील एका घरातील आहे. मे 2021 मध्ये झालेली ही क्रुर हत्या आता अंदाजे 18 महिन्यांनंतर प्रकाशात आली आहे. या हत्याकांडाची बाब लक्षात येताच आजुबाजूच्या परिसरामध्येही खळाबळ पसरली आहे.

पोलिसांच्या अंदाजानुसार, महिलेची उंची अंदाजे 4.5 फीट असेल ती सेक्स वर्कर म्हणून काम करत असल्याचा अंदाज आहे. महिलेच्या हत्याकांडाबाबात तसेच तिच्या ओळखीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तिची हत्या केल्यानंतर मृतदेह ड्रम मध्ये भरून त्याला टेप लावून लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या पोलिसांचा पहिला संशयित आरोपी जवळच वेल्डिंग शॉप मध्ये काम करणारा ऋषि आहे. ऋषि 33 वर्षीय आहे. तो आपल्या पत्नी आणि मुली सोबत राहतो.

ऋषिची पत्नी माहेरी Srikakulam येथे प्रसुतीसाठी गेलेली असताना त्याने हत्या झालेल्या त्या महिलेला त्याच्या घरी आणल्याचं सांगितलं जात आहे. त्या दोघांमध्ये काही वाद झाल्याने ऋषिने तिला स्कार्फने गळा घोटून मारून नंतर तिच्या शरीराचे तुकडे केले असावेत. नंतर मालकाला सांगून तो पत्नीच्या देखभालीसाठी Seetampeta गेला. मे 2021 नंतर तो परतलेला नाही. घरमालकाने ऋषिकडे घराचं भाडं मागण्यासाठी अनेकदा कॉल केला पण तो फोन उचलत नसल्याचं मालकाने सांगितलं आहे. नक्की वाचा: Pune Shocker: क्राईम शी निगडीत वेबसीरीज, सिनेमे पाहून एक्स गर्ल फ्रेंडच्या पतीची हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात .

घर रिकामं करताना त्याने ड्रम पाहिला तो उघडून पाहिला असता त्यामध्ये महिलेच्या शरीराचे तुकडे कोंबलेले आढळले आहेत. सध्या महिलेच्या शरीराचे तुकडे पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती city CP Ch Srikanth यांनी दिली आहे.