पुण्यात 26 वर्षीय व्यक्तीची चंदन नगर मध्ये हत्या केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांपैकी एकाचा मृत पुरूषाच्या पत्नीसोबत लग्नापूर्वी संबंध होते. चंदन नगर मध्ये मृतावस्थेमध्ये आढळलेल्या व्यक्तीचं नाव अक्षय प्रकाश भिसे आहे. रिपोर्ट्सनुसार स्त्री सोबत पुन्हा नव्याने संबंध जोडण्यासाठी भिसेचा खून शिंदेकडून करण्यात आल्याचा आरोप आहे. शिंदेचा अजून एक सहकारी संग्राम देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. दोघेही सोलापूरचे रहिवासी आहेत.
रिपोर्ट्सनुसार भिसेचा खून हा शिंदे कडून पूर्वनियोजित होता. या खूनाचं प्लॅनिंग देखील त्याने क्राईम शी निगडीत सिनेमे आणि वेब सीरीज पाहून केल्याचं सांगितलं जात आहे. नक्की वाचा: Shocking! खळबळजनक हत्या प्रकरणाचा पर्दाफाश; विवाहित प्रेयसीने केला प्रियकराच्या दुसऱ्या पत्नीचा खून .
पोलिसांच्या माहितीनुसार, शिंदे कडे पिस्तुल देखील अवैधरित्या आलं. कर्नाटकातून त्याने स्पोर्ट्स बाईक आणि हेल्मेट देखील चोरले आहे. 21 ऑगस्टला हे प्रकरण समोर कचरा गाडीवर चालक म्हणून काम करणार्या भिसेच्या खूनानंतर प्रकाशात आलं. चंदन नगर पोलिस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल आहे. आजूबाजूच्या भागातील अनेक सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर या खून प्रकरणाचे धागेदोरे समोर आले. खूनाच्या वेळेस वापरण्यात आलेल्या बाईकचाही पत्ता लावण्यामध्ये पोलिसांना यश आलं आहे.
गुरूवारी शिंदेला क्राईम ब्रांचच्या टीमने कर्नाटकच्या बिदार मधून पकडण्यात आले. मूळचा सोलापूरचा असला तरी शिंदे बिदार मध्ये भाल्कीत राहत होता. दुसरा आरोपी सोलापूरच्या टेंभुर्णी मध्ये एका हॉटेलमध्ये मॅनेजर होता. त्याला सोलापूर मध्ये अटक झाली. घटनेच्या वेळेस पुण्यात शिंदे सोबत दुसरा आरोपी देखील बाईक वरून आला होता.
भिसे वर गोळीबार करून तो पळून गेला. आता शिंदेला पिस्तुल कुठून मिळाले याचा शोध सुरू आहे.