Air India Servers Down All Over India: एअर इंडिया (Air India) या सरकारी विमान कंपनीचा SITA Server डाऊन झाल्याचा शेकडो प्रवाशांना फटका बसला आहे. राजधानी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Indira Gandhi International Airport) आणि मुंबई (Mumbai) येथील विमानतळावर शेकडो प्रवासी अडकूण पडले आहेत. त्यांच्या प्रवासाचा खोळंबा झाला आहे. भारत आणि विदेशातील सर्व्हर एकाच वेळी डाऊन झाल्याने प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
प्रवाशांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवासी तर गेले 3 ते पाच तासांहून अधिक काळ मुंबई विमातळावर अडकले आहेत. या प्रवाशांनी आरोप केला आहे की, एअर इंडिया कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना योग्य ती माहिती समाधानकारकपणे मिळत नाही.
@AshwaniLohani @airindiain Greetings Mr. Lohani. Welcome on board at Mumbai airport railway platform. Waiting for last 3.5 hrs (since 3:30 AM) to take a flight to London. Finally, the airport has become a railway platform minus announcements. Sending some glimpses. Compliments. pic.twitter.com/o6XetiyuJp
— Ajay Rawal (@ajayrawal) April 27, 2019
मुंबई विमानतलावर अडकलेल्या एका प्रवाशाने ट्विट केले आहे की, विमानतळावर कमीत कमी 2 हजार प्रवासी अडकले आहेत. संपूर्ण भारतात एअर इंडियाचे SITA डाऊन झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वर डाऊन झाल्यामुळे प्रवाशांना बोर्डींग पासही काढणे कठीण बनले आहे. त्यामुळे काही प्रवाशांनी मुंबई विमानतळावर जोरदार आक्षेप नोंदवला. (हेही वाचा, जगप्रसिद्ध S7 Airlines कंपनीच्या Co-Owner नतालिया फिलेव यांचे विमान अपघातात निधन)
Atleast 2000 people in Mumbai airport waiting because of the SITA software shutdown all over India. pic.twitter.com/TzYYFLE5vz
— Gayathri Raguramm (@gayathriraguram) April 27, 2019
प्राप्त माहितीनुसार सर्वर पहाटे 4 वाजलेपासून डाऊन आहे. त्यामुळे अनेक विमानांच्या उड्डाणांवर त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, एक तासाभरात मार्ग काढून सेवा पूर्ववत होइल असे एअर इंडियाने म्हटले आहे. SITA-DCS ब्रेकडाऊन झाल्याने सेवेत अडथळा येत आहे. आमचा तंत्रज्ञान विभाग काम करत असून लवकरच सेवा पूर्ववत होईल असे एअर इंडियाने म्हटले आहे. तसेच, प्रवाशांच्या गौरसोईबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे.