Air India Flight Horror: एअर इंडियाच्या New York-Delhi विमानात दारूच्या नशेत प्रवाशाचा घृणास्पद प्रकार; Business Class मध्ये महिला सहप्रवाशावर लघूशंका
Air India | (Photo Credits: Facebook)

एअर इंडियाच्या (Air India)  न्यूयॉर्क (New York) ते दिल्ली (Delhi) विमानामध्ये एक घृणास्पद प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. 26 नोव्हेंबर 2022 दिवशी अमेरिकेच्या John F Kennedy International Airport कडून दिल्ली कडे प्रवास करणार्‍या विमानात दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने सहप्रवासी असलेल्या महिलेच्या अंगावर लघुशंका केली. या प्रकारानंतर महिलेने तातडीने अलार्म वाजवत केबिन क्रु कडे सदर प्रकाराबाबत मदत मागितली. या किळसवाण्याप्रकारानंतर आता DCGA कडून एअर इंडियाकडे विचारणा करण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, पीडीत महिलेने घडल्या प्रकराबद्दल Tata Group चे चेअरमॅन N Chandrasekaran, यांना पत्र लिहून तपासाची मागणी केली आहे. ANI वृत्तसंस्थेसोबत बोलताना Air India च्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिस तक्रार नोंदवण्यात आली आहे.

महिलेने लिहलेल्या पत्रानंतर सारा प्रकार उजेडामध्ये आला आहे. त्यामध्ये केबिन क्रु यांनी या प्रकाराला गांभीर्याने घेतलं नसल्याचं आणि तातडीने कार्यवाही देखील न केल्याचं म्हटलं आहे. तसेच एअरलाईन्स कडून कोणतीही सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यात आली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बिझनेस क्लास मध्ये घडलेल्या या प्रकरामध्ये दारूच्या नशेत त्या व्यक्तीने अश्लील गोष्टी देखील केल्या असल्याचं म्हटलं आहे.

महिलेने आपले कपडे, बॅग, शूज सारे भिजल्याचं म्हटलं आहे. कर्मचार्‍याने तेथे आल्यानंतर कपड्यांवर खरंच लघवी केल्याचा वास येतोय का? हे तपासलं त्यानंतर बॅग, शूज वर डिसइंफेक्शन मारल्याचं त्यांनी पत्रात लिहलं आहे. नक्की वाचा: Social Media Influencer Bobby Kataria विरूद्ध दिल्ली पोलिसांकडून SpiceJet मध्ये धुम्रपान केल्या प्रकरणी FIR दाखल .

एअर इंडियाच्या न्यू यॉर्क ते दिल्ली विमानामध्ये एक घृणास्पद प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. 26 नोव्हेंबर 2022 दिवशी अमेरिकेच्या John F Kennedy international airport कडून दिल्ली कडे प्रवास करणार्‍या विमानात दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने सहप्रवासी असलेल्या महिलेच्या अंगावर लघुशंका केली. या प्रकारानंतर महिलेने तातडीने अलार्म वाजवत केबिन क्रु कडे सदर प्रकाराबाबत मदत मागितली. या किळसवाण्याप्रकारानंतर आता DCGA कडून एअर इंडियाकडे विचारणा करण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, पीडीत महिलेने घडल्या प्रकराबद्दल Tata Group चे चेअरमॅन N Chandrasekaran, यांना पत्र लिहून तपासाची मागणी केली आहे. ANI वृत्तसंस्थेसोबत बोलताना Air India च्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिस तक्रार नोंदवण्यात आली आहे.

महिलेने लिहलेल्या पत्रानंतर सारा प्रकार उजेडामध्ये आला आहे. त्यामध्ये केबिन क्रु यांनी या प्रकाराला गांभीर्याने घेतलं नसल्याचं आणि तातडीने कार्यवाही देखील न केल्याचं म्हटलं आहे. तसेच एअरलाईन्स कडून कोणतीही सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यात आली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बिझनेस क्लास मध्ये घडलेल्या या प्रकरामध्ये दारूच्या नशेत त्या व्यक्तीने अश्लील गोष्टी देखील केल्या असल्याचं म्हटलं आहे.

महिलेने आपले कपडे, बॅग, शूज सारे भिजल्याचं म्हटलं आहे. कर्मचार्‍याने तेथे आल्यानंतर कपड्यांवर खरंच लघवी केल्याचा वास येतोय का? हे तपासलं त्यानंतर बॅग, शूज वर डिसइंफेक्शन मारल्याचं त्यांनी पत्रात लिहलं आहे.

एअर इंडिया कडून या प्रकरणी एक अंतर्गत कमिटी बनवण्यात आली आहे. त्याद्वारा पुरूष प्रवाशाला "no-fly list," मध्ये टाकायचं की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे. सध्या हे प्रकरण एका सरकारी कमिटी कडे देखील तपासाला पाठवलं असल्याचं सांगण्यात आलं आहे.