राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना उपचारासाठी दाखल करुन घेण्यास अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) ने नकार दिला आहे. त्यानंतर आरजेडीचे आमदार भाई विरेंद्र यांनी एम्सवर गंभीर आरोप केला आहे. विरेंद्र यांनी एम्सवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, भाजपच्या दबावामुळेच एम्सने लालू प्रसाद यादव यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे.
लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यामध्ये शिक्षा भोगत आहेत. लालू प्रसाद यादव यांना काल रांची येथून एअर अँब्युलन्सच्या माध्यमातून दिल्ली येथे आणण्यात आले होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एम्सने लालू प्रसाद यादव यांना वॉर्डमध्ये न पाठवतात सकाळी 7 वाजता डिस्चार्ज दिला आहे. एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लालू प्रसाद यादव यांची प्रकृती ठिक आहे. (हेही वाचा, Lalu Prasad Yadav Fodder Scam: लालू प्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगवारी; राष्ट्रीय जनता दलाला धक्का, तेजस्वी यादव यांच्यासमोरील आव्हाने वाढली)
रांची एथील राजेंन्दर आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) च्या मेडिकल बोर्डाच्या बैठकीत मगंळवारी लालू प्रसाद यादव यांना दिल्लीला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. रिम्सचे निदेशक डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी म्हटले की, लालू प्रसाद यादव यांची स्थिती अधिक ढासळत चालली आहे. त्यांच्या हृदय आणि किडणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगल्या उपचारासाठी त्यांना दिल्ली येथे दाखल करणयात आले होते.