Rajnath Singh (Photo Credits: ANI)

देशभरामध्ये अग्निपथ (Agnipath Scheme) या सैन्य दलातील नव्या नोकर भरतीच्या प्रक्रियेवरून वातावरण तापलं आहे. देशात काही भागात यावरून जाळपोळ सुरू झाल्याने आता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) अग्निवीरांसाठी (Agniveer) संरक्षण खात्यामध्ये 10% नोकर्‍या राखीव ठेवल्या जातील असं जाहीर केले आहे.

अग्नीपथला होत असलेला विरोध पाहून वयोमर्यादा 23 वर्षापर्यंत वाढवण्याच्या निर्णयापाठोपाठ आता 10% आरक्षण जाहीर झाले आहे. याबाबतचे ट्वीट देखील करण्यात आले आहे. हे देखील नक्की वाचा:  Agnipath Yojana: केंद सरकार कडून देशातील तरूणांसाठी लष्करभरतीची नवी प्रक्रिया जाहीर; पहा काय आहेत वैशिष्ट्यं!

भारतीय तटरक्षक दल आणि संरक्षण नागरी पदे आणि सर्व 16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये आरक्षण लागू केले जाईल. हे आरक्षण माजी सैनिकांसाठी असलेल्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असेल असेही ट्वीट मध्ये नमूद करण्यात आले आहे.

देशात अग्निपथ ला मागील 4 दिवसांपासून मोठा विरोध होत आहे. "या तरतुदी लागू करण्यासाठी संबंधित भरती नियमांमध्ये आवश्यक दुरुस्त्या केल्या जातील. संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना त्यांच्या संबंधित भरती नियमांमध्ये समान सुधारणा करण्यास सूचित केले जाईल. आवश्यक वय शिथिल तरतूद देखील केली जाईल", असे मंत्रालयाच्या कार्यालयाने ट्विट केले.