Indian Army (Photo Credits-Twitter)

अग्निपथ सैन्य (Agnipath Scheme) भरतीसाठी देशभरातुन होत असलेल्या विरोधाला केंद्र सरकराने (Central Govt) मोठा निर्णय घेतला असुन याची वयोमर्यादेत 23 वर्ष इतकी ठेवली आहे. याआधी ही वयोमर्यादा 21 वर्ष इतकी होती. गेल्या दोन वर्षात एकही भरती न झाल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. गेल्या काही दिवसापासुन या योजनेविरोधात मोठी आंदोलने झाली आहे. बिहारमधील नवाद जिल्ह्यात भाजप कार्यालयालाही आंदोलकांनी आग लावल्याची घटना समोर आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे दोन वर्षांपासून सैन्य भरती न झाल्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Tweet

अग्निपथ योजनेची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत केली. ज्याला टूर ऑफ ड्यूटी असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत संरक्षण मंत्रालयाने सैन्य भरतीच्या नियमांमध्ये व्यापक बदल केले आहेत. त्यामुळे योजनेनुसार चार वर्षांसाठी सैन्यात भरतीची संधी खुली आहे. (हे देखी वाचा: Agnipath Scheme Protest: 'अग्नीपथ' योजनेस होणाऱ्या विरोधावरुन मनसे नेते अनिल शिदोरी यांचा केंद्राला 'हा' सल्ला)

त्याच वेळी, अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीची वयोमर्यादा संरक्षण मंत्रालयाने 17.5 वरून 21 वर्षे निश्चित केली होती. ज्यामध्ये संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी आंशिक बदल केले आणि प्रथमच कमाल वयोमर्यादा 23 वर्षे केली.