केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेला देशभरातील युवकांचा तीव्र विरोध आहे. या विरोधावरुन मनसे नेते अनिल शिदोरे यांनी केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. ट्विटरद्वारे दिलेल्या सल्ल्यात त्यांनी म्हटले आहे की, 'अग्नीपथ'ला - चार वर्षांसाठी पेन्शन लागू नसलेली लष्करातील भरती - होणारा हिंसक विरोध फार सूचक आहे. ह्याचा अर्थ बेरोजगारीतून येणारं नैराश्य फार खोल आहे. म्हणून देशाच्या प्राधान्यक्रमात अर्थव्यवस्था मजबूत करून रोजगार निर्मितीवर भर असावा.
ट्विट
“अग्नीपथ”ला - चार वर्षांसाठी पेन्शन लागू नसलेली लष्करातील भरती - होणारा हिंसक विरोध फार सूचक आहे. ह्याचा अर्थ बेरोजगारीतून येणारं नैराश्य फार खोल आहे. म्हणून देशाच्या प्राधान्यक्रमात अर्थव्यवस्था मजबूत करून रोजगार निर्मितीवर भर असावा..
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) June 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)