Union Minister Ravi Shankar Prasad and his press statement. (Photo Credit: PTI/Twitter)

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी देशाची अर्थव्यवस्था आणि मंदीबाबतचे वक्तव्य मागे घेतले आहे. शनिवारी रविशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेत असलेली मंदी (Recession in Economy) पूर्णपणे नाकारल. आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी चित्रपटांच्या कमाईचा उपयोग केला. रविशंकर प्रसाद म्हणाले होती की, 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी तब्बल 120 कोटींची कमाई केली आहे. असे असताना कुठे आहे आर्थिक मंदी? अर्थव्यवस्था निरोगी आहे म्हणूनच चित्रपट इतकी कमाई करू शकले. आता आपले विधान मागे घेताना प्रसाद यांनी पत्र जारी केले आहे. ज्यामध्ये ज्यांनी आपले म्हणणे मांडले आहे.

याबाबत बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘माझ्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. तरीही माझ्या वक्तव्याचा फक्त एक भागच, काही वाक्यच समाजापुढे मांडली गेली. हे पाहून मला वाईट वाटते. मी एक संवेदनशील व्यक्ती आहे, म्हणून मी माझे विधान मागे घेतो.’ मोदी सरकारमध्ये कायदा मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणारे रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेतील मंदी पूर्णपणे नाकारली होती. यासाठी सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे उदाहरण देण्यात आले होते. (हेही वाचा: तीन चित्रपटांनी तर 120 कोटी कमावले आहेत; आर्थिक मंदीबाबत विचारले असता केंद्रीय मंत्री Ravi Shankar Prasad यांनी केलं विधान)

याशिवाय नोकरीसंदर्भात एनएसएसओने जाहीर केलेला आकडेवारी त्यांनी फेटाळून लावत देशात मंदी नसल्याचे सांगितले होते. रविशंकर प्रसाद यांच्या या विधानानंतर चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका होऊ लागली. सोशल मीडियावाराही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उलटलेल्या दिसून आल्या. आता रवी शंकर प्रसाद यांनी आपले विधान मागे घेत आपण संवेदनशील असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासाचा दर सहा वर्षाच्या नीचांकावर 5% पर्यंत पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेसह जगातील अनेक प्रमुख रेटिंग एजन्सींनीही भारताच्या वाढीचा दर कमी केला आहे. मात्र, सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या चरणांची घोषणा केली आहे.