तीन चित्रपटांनी तर 120 कोटी कमावले आहेत; आर्थिक मंदीबाबत विचारले असता केंद्रीय मंत्री Ravi Shankar Prasad यांनी केलं विधान
Ravi Shankar Prasad | (संपादित संग्रहित)

भारतीय अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने जनतेला सामोरे जावे लागणाऱ्या आर्थिक मंदीबाबत बोलताना केंद्रीय कायदा आणि सुव्यवस्था मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेलया आणि तुफान चाललेल्या चित्रपटांच्या कमाईचं उदाहरण दिलेलं आहे.

प्रसाद म्हणाले,''भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असून आपण तीन चित्रपटांमधून 120 कोटी कमावले आहेत. मी चित्रपटांचा चाहता आहे. वाजपेयींच्या सरकारमध्ये मी माहिती आणि प्रसारण मंत्री होतो.'' (हेही वाचा. कुणी नोकरी देतं का नोकरी? आर्थिक मंदी नोकरीच्या मुळावर; Automobile सेक्टरसह अनेक क्षेत्रात नोकरभरती मंदावली)

चित्रपटांनी केलेल्या उत्तुंग कमाईचे दाखले देत प्रसाद म्हणाले, ''चित्रपट चांगला व्यवसाय करतात. 2 ऑक्टोबरला चित्रपटांनी 120 कोटी कमावल्याचे चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी स्वतः सांगितले आहे. देशात इतके पैसे आले आहेत हे सुदृढ अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे." (हेही वाचा. Economic Recession 2019: अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे, भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी, सत्याचा कोंबडा आरवलाय: शिवसेना)

भारतात सध्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. देशावर मंदीचं सावट आहे. सध्याच्या स्थितीत देशातील बेरोजगारीचं प्रमाण हे 50 वर्षांतलं सर्वात जास्त आहे. बांधकाम क्षेत्र, वाहनव्यवसायासह अनेक क्षेत्रांमधील रोजगाराचे आकडे कमी झाले आहेत.