Economic Recession 2019: अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे, भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी, सत्याचा कोंबडा आरवलाय: शिवसेना
Uddhav Thackeray, Former Prime Minister Manmohan Singh, Prime Minister Narendra Modi | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Economic Recession in India: देशात उद्भवलेल्या आर्थिक मंदी सदृश्य स्थितीबाबत शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे देशाच्या अर्थकारणाबद्दल माजी पंतप्रधान मनमोहन सिंह ( Manmohan Singh) यांनी केलेली टीका आणि केंद्र सरकारला दिलेला सल्ला या दोन्ही गोष्टी शिवसेनेने गांभीर्याने घेत केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. ही तोफ डागताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या विधानाचा आधार घेत 'आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी, सत्याचा कोंबडा आरवला आहे. तसेच, डॉ. मनमोहनन सिंह यांनी सौमन्य शब्दात सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झाला आहे. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) प्रणीत भाजप सरकारला घरचा आहेर देण्यासही शिवसेना विसरली नाही. अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेना पक्ष प्रमुखांनी पक्षाचे मुखपत्र दै. सामनामध्ये एक लेख लिहीला आहे. या लेखात केंद्र सरकारला सबुरीचा सल्ला देत सावधानतेचा ईशारा दिला आहे. सामनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार वैगेरैंपुरताच उरला आहे. त्यामुले 'देशाची व्यवस्था' नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचे राजकारण करुन नये. तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरावा असे अवाहन मनमोहनन सिंह यांच्यासारख्या शहाण्या मानसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे, असे शिवसेना म्हणते. (हेही वाचा, मोठी बातमी: सार्वजनिक क्षेत्रातील 10 मोठ्या बँकांचे विलीनीकरण; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा, पहा बँकांची यादी)

पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचे ठरवले आहे. मोदी ते करुन दाखवतील याबाबत आमच्या मनात शंका नाही. पण, अर्थव्यवस्था आणि लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. मनमोहन सिंह यांनी अर्थव्यवस्थेबद्दल गेल्या चार वर्षात जे सांगितले होते, तेच आज खरे ठरताना दिसत आहे. त्यांची टवाळी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मनमोहन सिंग हे रेनकोट घालून शॉवरखाली आंघोळ करतात' असे विधान केले. पण, ते रेनकोट घालून शॉवरखाली बसतील किंवा तरणतलावात डुबक्या मारतील, पण त्यांन अर्थशास्त्रातील कळते. हे सांगायला आम्हाला संकोच वाटत नाही. देशाचेही मत तेच आहे. गेली 35 वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्यांचा संबंध आहे. अत्यंत वाईट काळातही त्यांनी त्यांनी अर्थव्यवस्थेची मशागत केली. हे मान्यच करावे लागेल, असेही शिवसेनेने मुखपत्र सामनात म्हटले आहे.