अभिनेत्री Parineeti Chopra आणि खासदार Raghav Chadha रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा; लवकरच होऊ शकतो 'रोका'- Reports
Parineeti Chopra, Raghav Chadha (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री गुरुवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये राघवसोबत स्पॉट झाली होती. याआधीही या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे, त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवा सतत उडत आहेत. अहवालानुसार हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोघांनीही याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्याचवेळी आता दोघांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी सुरु झाल्या असल्याच्याही बातम्याही समोर येत आहेत.

दोघेही लवकरच लग्न करू शकतात असे अहवाल काही माध्यमांनी दिले आहेत. रिपोर्टनुसार लवकरच परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा रोका होईल. सध्या दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्याने रोकाची तारीख अद्याप ठरलेली नाही परंतु हा अतिशय खासगी कार्यक्रम असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा: अभिनेत्री Uorfi Javed लवकरच अडकणार विवाह बंधनात? पोस्ट शेअर करून दिली माहिती)

गुरुवारी राघव आणि परिणिती दोघेही पांढऱ्या कपड्यात एकत्र दिसले होते, त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, दोघेही यूकेमध्ये शिकत असल्यापासून एकमेकांना ओळखत आहेत. रिपोर्ट्सनुसार, परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आहे.

परिणीती आणि राघव दोघेही जानेवारीत लंडनमध्ये झालेल्या पहिल्या इंडिया यूके आऊटस्टँडिंग अचिव्हर्स अवॉर्ड्समध्ये सहभागी झाले होते. ब्रिटीश विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणाऱ्या कार्यक्रमात ते 75 पुरस्कार विजेत्यांपैकी एक होते. दरम्यान, परिणीती लवकरच इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिलजीत दोसांझही दिसणार आहे.