Mumbai: ऑनलाइन लुडो खेळणं मुंबईतील तरूणाला पडलं महागात, बंदुकीचा धाक दाखवत लुटले 60 लाख रुपये
Gun | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

धारावी (Dharavi) येथील एका 33 वर्षीय व्यक्तीला एका ठिकाणी बंदुकीच्या धाकावर (Gunpoint) डांबून, हल्ला करून चार जणांनी 60 लाख रुपये लुटले. ऑनलाइन लुडो (Ludo) खेळताना त्याचे तब्बल 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सर्व आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, गुन्हे शाखेनेही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला असून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदार क्लॅडियस जुड मुडलियार यांनी धारावी पोलिसांना (Dharavi Police) माहिती दिली की, त्याचा एक मित्र मुश्रीफ खान याने त्याच्याकडून ₹ 5,000 उसने घेतले होते. पैसे परत करण्यासाठी खानने त्याला 3 ऑक्टोबर रोजी सांताक्रूझ येथे भेटण्यासाठी बोलावले होते.

खान यांच्या सूचनेनुसार, मुदलियार सांताक्रूझ (पूर्व) येथील शास्त्री नगर येथील एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पोहोचला. जेव्हा तो त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा खान त्याच्या मित्रांसोबत वेलू मुर्गन आणि इतर दोघांसह तिथे होता. त्यांनी मुदलियारला दारू देऊ केली आणि नंतर मोबाईलवर लुडो खेळायला सुरुवात केली,असे पोलिसांनी सांगितले. हेही वाचा Crime: निर्दयीपणाचा कळस ! मुंबईत अवघ्या एक लाखासाठी विकले पोटच्या मुलाला, आईसह एका महिलेला अटक

गेम खेळताना, त्याने ₹ 60 लाख गमावले, परंतु मुर्गन आणि त्याच्या मित्रांना पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर एका आरोपीने बंदूक काढून रोख रक्कम आणि सोन्याचे साहित्य लुटले. आरोपींनी त्याला मारहाण केली, त्याला जागेवर डांबून ठेवले आणि संपूर्ण रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या फिर्यादीने घरातून दागिने आणि रोख रक्कम आणली आणि आरोपींना दिली, असेही पोलिसांनी सांगितले.

धारावी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विजय कांदळगावकर म्हणाले, आम्हाला काही दिवसांपूर्वी तक्रार प्राप्त झाली आणि आम्ही प्राथमिक तपास केला. ही घटना सांताक्रूझ येथे घडली असल्याने गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही पुढील तपासासाठी तो वाकोला पोलिसांकडे वर्ग केला आहे.