असे म्हणतात की, ‘शौक बड़ी चीज़ होती है’. या शौकच्या नादात अनेक मोठ मोठी राज्ये रसातळाला गेली. अनेकांना हटके फोन नंबर किंवा हटके वाहन क्रमांकाचा शौक असतो. यासाठी हे लोक थोडे जास्त पैसे देऊन आपला आवडता क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला याच ‘शौक’बद्दल सांगणार आहोत. तर एका व्यक्तीने 71 हजारांची स्कूटी (Scooty) खरेदी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने आपल्या या स्कूटीसाठी 15 लाख रुपयांची नंबर प्लेट खरेदी केली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरे आहे.
हे प्रकरण आहे चंदीगड सेक्टर 23 मधील, जिथे ब्रिजमोहन नावाच्या 42 वर्षीय व्यक्तीने काही दिवसांपूर्वी होंडा अॅक्टिव्हा (Honda Activa) स्कूटी खरेदी केली होती. या स्कूटीची किंमत 71 हजार रुपये आहे. आता आश्चर्याची बाब म्हणजे हजारोच्या या स्कूटीसाठी त्याने 15.4 लाख रुपयांची नंबर प्लेट खरेदी केली आहे. आपल्या मुलाच्या सांगण्यावरून आपण लाखो रुपये खर्चून हा नंबर विकत घेतल्याचे ब्रिजमोहनने सांगितले.
ब्रिजमोहनच्या होंडा अॅक्टिव्हा स्कूटीची किंम 71 हजार रुपये आहे आणि आता तो त्यावर 15.4 लाख रुपयांना विकत घेतलेला CH01-CJ-0001 हा VIP क्रमांक लावेल. ब्रिजमोहनने 14 ते 16 एप्रिल दरम्यान लिलावादरम्यान हा क्रमांक खरेदी केला होता. येथे एकूण 378 क्रमांकांसाठी 1.5 कोटी रुपयांची बोली लागली. ब्रिजमोहनचा खरेदी केलेला क्रमांक CH01-CJ-0001 लिलावात सर्वात वरचा होता. सुरुवातीच्या 50 हजारांच्या किमतीनंतर तो अखेर 15.4 लाख रुपयांना खरेदी करण्यात आला. (हेही वाचा: Electric Scooter Fire: पुन्हा एकदा Okinawa इलेक्ट्रिक स्कूटर लागली आग; यावेळी संपूर्ण शोरूम जळून खाक)
दरम्यान, आत्तापर्यंतचा सर्वात महाग क्रमांक 2012 मध्ये 0001 होता, ज्यासाठी 26.05 लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. हा नंबर मर्सिडीजसाठी वापरला गेला होता, ज्याची किंमत या नंबरपेक्षा 4 पट जास्त होती. मात्र या स्कूटीची किंमत ब्रिजमोहनच्या नंबरपेक्षा 21 पट कमी आहे.