दिल्ली: मोतीनगर येथील रोड शो दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकवली (Video)
A man slaps Delhi Chief Minister Arvind Kejriwal during his roadshow in Moti Nagar area (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Elections 2019) च्या प्रचारासाठी दिल्लीतील (Delhi) मोतीनगर (Moti Nagar) भागात रोड शो (Roadshow) करत असताना एका अज्ञात व्यक्तीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. रोड शो दरम्यान जमाव केजरीवाल यांच्या नावाचा जयघोष करत असताना एक युवक थेट जीपवर चढला आणि त्याने जीपमध्ये उभ्या असलेल्या केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकवली.

ANI ट्विट:

पहा व्हिडिओ:

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांना कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचे नाव सुरेश असून तो दिल्लीच्या कैलाश पार्क येथील रहिवासी आहे. केजरीवाल यांच्यावर नाराज असल्याने त्याने हे पाऊल उचलले. यापूर्वी देखील 2014 मध्ये केजरीवाल यांना एका ऑटो ड्रायव्हरने कानशिलात लगावली होती.

यापूर्वी काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना भर प्रचारसभेत कानशिलात लगावण्याचा प्रकार घडला होता. या घटनेचाही व्हिडिओ समोर आला होता. पाटीदार आरक्षण आंदोलन सुरु असताना पत्नी प्रेग्नेंट असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागल्याने या व्यक्तीने हार्दिक पटेल यांच्यावरील राग कानशिलात लगावून व्यक्त केला होता.