Coronavirus | Image Used For Representational Purpose | (Photo Credit: IANS)

काही दिवासांपूर्वी कर्नाटक (Karnataka)  मधील कलबुर्गी (Kalaburagi) येथील 76 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) हा पहिला बळी होता. आता या व्यक्तीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. हे डॉक्टर 63 वर्षांचे असून त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.  त्यांना घरातच अलिप्त ठेवण्यात आले असून लवकरच त्यांना विलगीकरण कक्षात (Isolation Ward) शिफ्ट केले जाईल, अशी माहिती कलबुर्गीचे उपायुक्त शरत बी यांनी दिली आहे.

कर्नाटकात अजून एका 20 वर्षांच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली असून तो UK हून परतला होता. या दोन नव्या रुग्णांसह कर्नाटकमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 इतकी झाली आहे. (कोरोना व्हायरसचा भारतात पहिला बळी, कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील वृद्धाचा मृत्यू)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसने जगभरासह भारतालाही विळखा घातला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 125 झाली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या 39 इतकी असून केरळात 22 रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. गुरुग्राम येथे एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याने हरियाणामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे.