
Youths Drown In Ganga River At Patna: पाटण्यातील (Patna) कलेक्टर घाटावर गंगा नदीत (Ganga River) व्हॉलीबॉल खेळत असताना बुधवारी एक मोठा अपघात झाला. एका अल्पवयीन मुलासह 9 तरुण नदीत बुडाले, त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आणि 3 जणांना खलाशांनी वाचवले. 13 वर्षांचा रेहान अजूनही बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी एसडीआरएफचे बचाव कार्य सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, काही तरुण गंगा नदीजवळ व्हॉलीबॉल खेळत असताना हा अपघात झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, खेळत असताना तरुण खोल पाण्यात गेले आणि जोरदार प्रवाहामुळे ते बुडू लागले. विशाल, रजनीश, अभिषेक आणि गोविंद अशी मृतांची नावे आहेत. सुटका करण्यात आलेल्या तरुणांमध्ये सचिन, आशिष आणि नितीन यांचा समावेश आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या खलाशांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. तसेच या घटनेची एसडीआरएफला माहिती दिली. (हेही वाचा -Boy Drown in Ratnagiri Sea: रत्नागिरीच्या आरे वारे समुद्रात बुडून पनवेलमधील एकाचा मृत्यू, सुदैवाने दुसरा बचावला)
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन, विशाल, अभिषेक आणि रजनीश हे पटना कॉलेजजवळील यादव लेनमधील कृष्णा निवास लॉजमध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. विशाल वायुसेनाची, अभिषेक एसएससीची आणि रजनीश इन्स्पेक्टर भरती परीक्षेची तयारी करत होता. तथापी, घटनेदरम्यान बाजूला उभ्या असलेल्या एका तरुणाने सांगितले, 'सर्व 15 मिनिटांत घडले. कोणालाही काही समजण्यापूर्वीच सर्वजण बुडाले होते.'(हेही वाचा: Lonavala: वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला गेलेल्या दोघांचा खाणीत बुडून मृत्यू, लोणावळ्याच्या कुसगाव परिसरातील घटना)
खोल पाण्यात गेल्यामुळे घडला अपघात -
सचिन, विशाल, अभिषेक आणि रजनीश आंघोळ करत असताना व्हॉलीबॉल खेळत होते. त्याच वेळी, गोविंद, रेहान आणि नितीन हेही गंगेत स्नान करण्यासाठी गेले. पण खेळत असताना, सर्वजण खोल पाण्यात गेले आणि प्रवाहात अडकले. अचानक मदतीसाठी तरुणांचा आवाज आल्याने खलाशी घटनास्थळी पोहोचले. मात्र, खलाशी येईपर्यंत बरीच मुले बुडाली होती. (हेही वाचा -Women Drown In Resort Pool: हृदयद्रावक! मंगळुरूमध्ये एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 महिलांचा रिसॉर्ट पूलमध्ये बुडून मृत्यू; पहा व्हिडिओ)
खलाशांमुळे वाचले तिघांचे प्राण -
एका खलाशाच्या सतर्कतेमुळे सचिन, आशिष आणि नितीन बचावले. उर्वरित तरुणांना शोधण्यासाठी एसडीआरएफने 7 तास शोध मोहीम राबवली. बुधवारी संध्याकाळी उशिरा विशालचा मृतदेह सापडला, तर रेहानचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. विशाल, अभिषेक आणि रजनीश यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्व तरुण मोठे स्वप्न घेऊन घरातून पाटण्याला आले होते.