Drowning प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Boy Drown in Ratnagiri Sea: रत्नागिरी तालुक्यातील आरे वारे समुद्रात (Aare Ware Sea) बुडून एकाचा १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. समुद्रात पनवेल येथील शनिवारी दोघेजण बुडाले होते. यातील एकाला वाचवण्यात यश आले. मात्र, सिद्धार्थ विनायक फासे वय 19 या तरुणाचा यात मृत्यू झाला. प्रविंद्र बिराजदार याला वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (हेही वाचा: Lonavala: वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला गेलेल्या दोघांचा खाणीत बुडून मृत्यू, लोणावळ्याच्या कुसगाव परिसरातील घटना)

वसई-विरार महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक विनायक फासे हे १५ ऑगस्टला आपल्या कुटुंबासह रत्नागिरीत पर्यटनासाठी गेले होते. शनिवारी दुपारी ते कुटुंबासमवेत आरे-वारे येथील समुद्र किनारी गेले होते. समुद्र किना-यावर फिरत असताना त्यांच्या मुलगा सिद्धार्थ हा पाण्यात उतरला.

त्यावेळी अचानक लाट आल्याने सिद्धार्थ पाण्यात ओढला गेला.त्याला वाचविण्यासाठी प्रविंद्र बिराजदार पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सिद्धार्थ आत ओढला गेला. अशातच प्रविंद्र बिरादार याचा श्वास गुदमरु लागल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी नातेवाईकांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांसह जीवरक्षकांनी पाण्यात उडी घेतली. त्यांनी प्रविंद्र बिरादार याला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र पाण्याच्या प्रवाहात आत ओढला गेलेल्या सिद्धार्थचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.