Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In India Today: केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासात कोरोनाचे 61,537 नवे रुग्ण आढळले आहेत. यानुसार देशातील कोरोना बाधितांची एकुण संंख्या 20,88,612 वर पोहचली आहे. यापैकी 6,19,088 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Coronavirus Active Cases) आहेत तर 14,27,006 बरे झाले आहेत. जर आपण ही आकडेवारी पाहिली तर सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 20 लाखाच्या पार असला तरी मुळ कोरोना रुग्ण हे 6 ते 7 लाखाच्या दरम्यान आहेत. तर बरे होणार्‍या (Coronavirus Recovered Cases) रुग्णांंची संख्या ही अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत दुप्पटहुन अधिक आहेत. मागील 24 तासात कोरोनामुळे 933 मृत्यु झाले असुन आजवरच्या कोरोना मृतांची (COVID19 Deaths) संंख्या ही 42,518 वर पोहचली आहे.

(हे ही वाचा - COVID-19 Vaccine: पुण्याच्या Serum Institute of India चा Bill And Melinda Gates Foundation व Gaviसोबत करार; 2021 पर्यंत 100 मिलियन डोस उपलब्ध करण्याचं लक्ष्य)

दुसरीकडे कोरोनाच्या चाचण्यांंची संंख्या दिवसागणिक वाढवण्यात येत आहे. 8 ऑगस्टपर्यंत कोरोना व्हायरसच्या एकुण 2 कोटी 33 लाख 87 हजार 171 चाचण्या झाल्या आहेत. यापैकी 5,98,778 चाचण्या या मागील 24 तासात झाल्या आहेत, याबाबत आयसीएमआर तर्फे माहिती देण्यात आली आहे.

ANI ट्विट

दरम्यान, कोरोनाच्या रुग्णसंख्येची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्र अजुनही प्रथम स्थानी आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 4,90,262 रुग्ण असुन मृतांची एकूण संख्या 17,092 वर पोहोचली आहे. सद्य घडीला राज्यात 1,45,582 रुग्णांवर उपचार सुरु असून 3,27,281 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.