7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% ने वाढ; आज मंत्रिमंडळात निर्णय
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

देशभरातील केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employee)  आज मोदी सरकारकडून (Modi Government) आनंदाची बातमी मिळाली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांना डीए (DA) वाढवून देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. मंत्रिमंडळाने 3% डीए वाढवून देण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता डीए,डीआर (DR) मध्ये वाढ होणार असल्याने लाखो कर्मचारी, वेतनधारकांसाठी ही गूड न्यूज आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता 1 जानेवारी 2022 पासून डीए, डीआर मध्ये 3% वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या हा महागाई भत्ता 31% होता. 3% वाढ झाल्याने तो 34% झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील कोट्यावधी कर्मचारी, पेंशनधारकांना होणार आहे. हे देखील नक्की वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारचा मोठा झटका; समोर आला DA वाढवण्याबाबत नवीन अपडेट .

ANI Tweet

नियमावलीनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए, डीआर हा दरवर्षी दोनदा वाढवला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात हा दर वाढवला जातो.त्यामुळे ही दरवाढ कर्मचार्‍यांना अपेक्षित होती. दरम्यान महागाई भत्ता हा कर्मचारी शहरी, निम शहरी आणि ग्रामीण भागात काम करतो यावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या पदानुसार आणि कामाच्या ठिकाणानुसार तो कमी-जास्त असू शकतो. मोदी सरकारच्या निर्णयाचा फायदा आता 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्सना होणार आहे.