7th Pay Commission Latest Update: केंद्र सरकारी कर्मचारी, निवृत्तीधारकांसाठी मोठी बातमी; DA Installment, Arrears जुलै नव्हे तर 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता
Money | Representative Image (Photo Credits: Pixabay)

सध्या केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना महागई भत्त्याच्या वाढी बाबत मोदी सरकार कडून होणार्‍या घोषणेची प्रतिक्षा आहे. अंदाजे 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनर्सना या गूडन्यूज मधून डबल फायदा होणार आहे. मागील वर्षी कोरोना संकटामुळे महागाई भत्ता फ्रीझ करण्यात आला होता पण तो जुलै 2021 पासून पुन्हा पूर्ववत केला जाईल अशी अपेक्षा होती पण आता मीडीया रिपोर्ट्सनुसार तो जुलैच्या पगाराऐवजी सप्टेंबर 2021 च्या पगारापासून मिळण्याची शक्यता आहे.

नॅशनल काऊंसिल ऑफ जेसीएम अर्थात केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्त्व करणार्‍यांकडून नुकतेच एक डीए बाबतचे पत्र जारी करण्यात आले आहे. office of JCM Secretary Shiv Gopal Mishra यांच्या पत्रात दिलेल्या माहितीनुसार, 26 जूनला झालेली कॅबिनेट सेक्रेटरी यांच्यासोबतची बैठक सकारात्मक होती. यामध्ये कर्मचार्‍यांच्या हिताच्या अनेक गोष्टींवर चर्चा झाली. त्यापैकी एक म्हणजे डीए. मागील 18 महिन्यांपासून त्याला फ्रीझ करण्यात आले आहे. सरकार जुलै पासून ते पुन्हा पूर्ववत करण्याच्या तयारीत आहे. पण जुलै महिन्यात 3 प्रलंबित हप्ते मिळण्याची शक्यता नसल्याचे वृत्त DNA ने त्यांच्या रिपोर्ट मध्ये लिहले आहे.

जेसीएम सेक्रेटरी मिश्रा यांच्या माहितीनुसार, कॅबिनेट सेक्रेटरी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांचे डीए, डीआर पूर्ववत करण्याबाबत सकारात्मक आहेत. जानेवारी 2020, जून 2020 आणि जानेवारी 2021 चे हप्ते एकत्रितच दिले जातील. हे तिन्ही हफ्ते सप्टेंबर मध्ये मिळण्याची शक्यता आहे. सोबतच जुलै आणि ऑगस्ट 2021 चे एरिअर्स देखील सप्टेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. (नक्की वाचा: महागाईपासून दिलासा! मोदी सरकारकडून 400 वस्तू आणि 80 सेवांवरील GST मध्ये घट, दैनंदिन वस्तू झाल्या स्वस्त‌‌).

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना सध्या 17% डीए मिळतो. आता 3 हफ्ते दिल्यानंतर तो 28% होणयची शक्यता आहे. तर झी बिझनेसच्या रिपोर्ट्सनुसर जून 2021 मध्ये अजून 3% वाढ करून तो एकूण 31% होण्याची शक्यता आहे.