7th Pay Commission: केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा किमान पगार 8000 रुपयांनी वाढण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर सुद्धा ठरणार लाभदायी
7th Pay Commission | (Photo credit: archived, edited, representative image)

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees)  सरकारकडून लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार असल्याची शक्यता आहे. यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ करण्याविषयी तसेच फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) अंतर्गत फायदा वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. मागील काही काळापासून 7व्या वेतन आयोगाच्या निमित्ताने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांकडून मागणी होत होती, याबाबत सध्या समोर आलेल्या माहिती नुसार, नोव्हेंबर महिना अखेरीपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार 26000 करण्यात येऊन शकतो असे झाल्यास एकाच वेळेत पगारामध्ये 8000 ची वाढ होऊ शकते. तसेच फिटमेंट फॅक्टर सुद्धा 2.57  वरून 3.68  करण्यात यावा अशी मागणी होत होती, तूर्तास याविषयी अधिकृत निर्णय देण्यात आलेला नाही.

7th Pay commission: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; राज्य सरकारकडून नववर्षाची भेट

सरकारी कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर हा सद्य घडीला 2.57  इतका आहे यात वाढ करून 3.68  करणे ही मागणी आर्थिक दृष्टीने थोडी कठीण होऊ शकते, अशातच देशातील अर्थव्यव्यस्थेची स्थिती पाहता याविषयी निर्णय घेणे सरकारने लांबणीवर टाकल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे  सध्या कर्मचाऱ्यांचा किमान पगार हा फारच कमी असल्याचे म्हणत त्यामध्ये वाढ करण्यात यावी किंवा अन्य मार्गाने कर्मचाऱ्यांना लाभ होईल अशी तरतूद व्हावी अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, लवकरच या प्रकरणी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यानंतर अधिकृत घोषणा केली जात असल्याचे माध्यमांमध्ये सांगितले जात आहे. कॅबिनेट कडून याबाबत निर्णय झाल्यावर अर्थ मंत्रालयातून यावर शिक्कामोर्तब होणे गरजेचे असेल. या मध्ये काही अवधी जाणार असला तरी नोव्हमेंबर महिना अखेरीपर्यंत या निर्णय प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी दिवाळीत सुद्धा सातव्या वेतन आयोगाच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि परिवहन भत्त्यात वाढ करण्यात आली होती.