7 Pay Commission News: नववर्षाची उत्सुकता सध्या जगभरातील लोकांना आहे. मात्र केंद्रीय कर्मचारी यंदा नववर्षाची विशेष उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरम्यान मोदी सरकार कडून नव्या वर्षात लाखो केंद्रीय कर्मचार्यांना महागाई भत्ता आणि किमान वेतनामध्ये वाढ असं दुहेरी गिफ्ट अपेक्षित आहे. आगामी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचार्यांना जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये वाढ मिळते. यंदा जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचार्यांचा डीए 4% नी वाढण्याची शक्यता आहे. सध्या यावर चर्चा सुरू आहे. 7th Pay Commission: कर्मचार्यांना प्रमोशन मिळवण्यासाठी पुर्ण करावी लागणार 'ही' एक अट; अर्थमंत्र्यालयाने दिली माहिती.
केंद्रीय कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून किमान वेतनामध्ये 8000 रूपयांची वाढ मिळावी यासाठी मागणी करत आहेत. दरम्यान नववर्षात केंद्रीय कर्मचार्यांच्या किमान वेतनामध्ये 8000 रूपयांची वाढ झाल्यास भविष्यात ग्रुप डी कर्मचार्यांचे किमान वेतन 26,000 रूपये होणार आहे.
किमान वेतन वाढीसोबतच प्रस्तावित महागाई भत्त्यामध्येही 4% वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता 17% वरून 21% वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचार्यांच्या वेतनामध्ये किमान 720 ते 10,000 रूपये इतकी वाढ होण्याची शक्यता आहे.
नववर्षात मोदी सरकारने या दोन्ही प्रस्तावांना मान्यता दिल्यासकेंद्रीय कर्मचार्यांसाठी नववर्षात हा गिफ्ट्सचा डबल धमाका ठरणार आहे. दरम्यान यंदाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी दिवशी जाहीर केला जाणार आहे. त्यामध्ये इन्कम टॅक्स स्लॅब्समध्येही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.