Narendra Modi | (Photo Credits: ANI/Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (17 जुलै) संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषदेला (United Nations Economic and Social Council) संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचे (United Nations) यंदाचे अमृत महोत्सवी (Platinum Jubilee) वर्ष आहे. त्यानिमित्त न्यूयॉर्क येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8.30 वाजता त्यांचे भाषण सुरू होईल. संयुक्त राष्ट्रसंघाचे भारताला तात्पुरते सदस्यत्व मिळाले आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच युनोसमोर बोलणार आहेत. पंतप्रधानांचे भाषण अभासी रुपात (व्हर्च्युअल) होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधी गेल्या वर्षी 7 सप्टेंबर 2019 या दिवशी संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत भाषण केले होते. त्या वेळी पंतप्रधानांनी जगभरातील सर्व देशांनी दहशतवादाच्या विरोधात एकत्र येऊन काम करायला हवे असे अवाहन केले होते.

दरम्यान, भारताला संयुक्त राष्ट्र संघाचा हंगामी सदस्य म्हणून निवडले गेले आहे. हंगामी सदस्यत्वाचा कार्यकाळ 1 जानेवारी 2021 मध्ये संपत होता. तोपर्यंत भारताला ही मुदतवाढ मिळाली आहे. ही निवड करताना झालेल्या मतदानावेळी भारताच्या बाजूने 192 पैकी 184 मते पडली. अमेरिका (यूएस), युनायटेड किंग्डम (यूके), फ्रान्स, रशिया आणि चिन हे देश संयुक्त राष्ट्रसंघाचे कायमस्वरुपी सदस्य आहेत.