Truck carrying an aerospace horizontal autoclave weighing 70 tonnes reached VSSC Thiruvananthapuram (Photo Credits: ANI)

70 टन वजनाचे Aerospace Horizontal Autoclave वाहून नेणारा 74 चाकी ट्रक आज (19 जुलै) सकाळी तब्बल वर्षभरानंतर केरळमध्ये दाखल झाले. हे एरोस्पेस पार्ट तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) मधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (Vikram Sarabhai Space Centre) येथे नेण्यात आले. हा ट्रक सुमारे एक वर्षापूर्वी महाराष्ट्रातून निघाला असून याने सुमारे 1700 किमी चे अंतर पार केले आहे. या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) येथून जुलै 2019 मध्ये झाली होती. 4 विविध राज्यातून प्रवास करत हा ट्रक आज केरळ येथे पोहचला.

रिपोर्टनुसार, या ट्रॅकमध्ये खूप महत्त्वाच्या वस्तू असल्याने सोबत पोलिसांच्या गाड्या देखील प्रवास करत होत्या. कोरोना व्हायरसच्या ल़ॉकडाऊनमुळे या ट्रॅकचा प्रवास थोडासा मंदावला. आज संध्याकाळपर्यंत याची डिलिव्हरी विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये देण्यात येईल.

ANI Tweet:

Autoclave महाराष्ट्रातून केरळमध्ये पोहचवण्याचे काम प्रायव्हेट एजेन्सीला सोपवण्यात आले होते. या एजेन्सीचे कर्मचारी सुभाष यादव यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना असे सांगितले की, "आंध्रप्रदेशमध्ये हा ट्रॅक लॉकडाऊनमुळे महिनाभर अडकून होता. नंतर आमच्या एजन्सीच्या प्रयत्नाने हा ट्रॅक आंध्रप्रदेशमधून हलवण्यात आला. कोविड-19 लॉकडाऊनमुळे इंजिनियर्स आणि मॅकेनिक्सची उपलब्धता मर्यादीत असल्यामुळे 30 जणांच्या टीमने हा Volvo FM Heavy-Duty Truck हलवण्याचे प्रयत्न केले." ही मशीन 7.5 मीटर उंच आणि 7 मीटर रुंद एवढी आहे. या autoclave चा वापर एरोस्पेसमधील मोठे प्रॉडक्स निर्मितीसाठी आणि वेगवेगळ्या स्पेस प्रोग्रॅमसाठी होईल.