पुणे शहरातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची आतापर्यंतची संख्या 1, 80,674 इतकी झाली आहे. त्यातील 4,663 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 1,73,333 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 387 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 97, 442 इतकी झाली आहे. त्यापैकी 93, 997 जणांनाआतापर्यंत डिस्चार्ज देण्यत आला आहे. आज दिवसभरात 150 जण कोरोना व्हायरस संक्रमित आढळून आले. तर 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरात सध्या 639 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सर्वसामान्यांशी पुन्हा संपर्क करत मुंबई महापालिकेने नो कोरोना म्हणत MissionZero सुरु केले आहे. बीएमसीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी आमची बैठक झाली. या बैठकीत आम्ही आग्रह धरला की कोविड लसीकरण मोहीम भारत सरकारने प्रायोजित केली पाहिजे. तसेच, एका कंपनीला एकच राज्य देण्यात यावे, अशी मागणी आम्ही केंद्राकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पायउतार होणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरील ब्लॉक फेसबुकने अनिश्चित काळासाठी वाढवून त्यामध्ये किमान पुढील दोन आठवड्यांची वाढ केली आहे.

जम्मू आणि काश्मीर सरकारने शेजारच्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार पाहता 14 जानेवारी 2021 पर्यंत कोणत्याही उद्देशाने जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात कोणत्याही हेतूने कुक्कुट मांसासह सजीव पक्ष्यांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे.

तामिळनाडू: चेन्नई एअर कस्टमने दुबई / शारजाह विमानातून 72.72२ किलो सोने जप्त केले. एका महिला प्रवाशाला चॉकलेट रॅपरमधून 660 ग्रॅम सोने लपवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सर्व सोन्याची किंमत सुमारे 1.97 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र: लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे हे तीन दिवसांच्या दक्षिण कमांडच्या मुख्यालयाच्या दौर्‍यावर पुण्यात दाखल झाले आहेत. ऑपरेशनल सज्जता, कोविड दरम्यान देण्यात येणारी मदत, पूरमुक्ती आणि सैन्याच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांचा आढावा त्यांनी घेतला.

नवा कोरोना व्हायरस स्ट्रेन संक्रमित रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या वाढली. आज नवे 3 रुग्ण आढळले असून, तीन्ही रुग्ण पिंपरी चिंचवड येथील असल्याचे वृत्त आहे. 

महाराष्ट्र राज्यात आज 3729 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3350 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1856109 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 51,111 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.78% झाले आहे.

 

Load More

अमेरिकेमध्ये जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी कॉंग्रेसची बैठक सुरू असताना डॉनल्ड ट्रम्प यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात धुडघुस घातला आहे. वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीमध्ये ट्रम्प कार्यकर्ते घुसले आणि तोडफोड करण्यास सुरुवात झाली. यानंतर पेटलेल्या हिंसाचारामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या हिंसक आंदोलनानंतर ट्विटर आणि फेसबूकने देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंट्सवर कारवाई केली आहे. त्यांच्या सोशल मीडियातील वक्तव्यामुळे हिंसाचार अधिक तीव्र होऊ शकतो त्यामुळे त्यांच्या अकाऊंट्सवरून काही व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. तर 12 तासांसाठी अकाऊंटदेखील ब्लॉक करण्यात आले आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचं अकाऊंट कायमचं ब्लॉक होईल अशी ताकीद देखील देण्यात आली आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या टीम इंडीयाचा आज ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये सुरू झाला आहे. मात्र पहिल्याच दिवशी पावसाचा वत्यय आल्याने काही काळ खेळ थांबवण्यात आला होता. सुरूवातीला ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता महाराष्ट्रात ऐन थंडीत पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाण्यामध्येही हलक्या सरी बरसू शकतात.