मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद, एकूण रुग्णांची संख्या 1,21,027 वर; 7 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Aug 07, 2020 11:36 PM IST
अयोध्या राममंदिराच्या भूमीपूजनाचा (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) कार्यक्रम 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यथासांग पार पडला. या सोहळ्याचे राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी स्वागत केले आहे. मात्र MIM चे नेते ओवेसींनी (Owaisi)वादग्रस्त विधान केले होते. यावर सडकून टीका करत काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही. अर्थात यात नेहमीप्रमाणे असदुद्दीन ओवेसी हेच आघाडीवर आहेत, असं म्हणत शिवसेनेनं (Shivsena) ओवेसींचा सामनाच्या अग्रलेखातून (Saamna Editorial) खरपूस समाचार घेतला. 'बाबर जिंदा है। जिंदा रहेगा' असे ओवेसी यांनी राममंदिराच्या भूमीपूजनानंतर वक्तव्य केले होते.
दरम्यान मुंबईत मुसळधार पावसाने आज सकाळपासून थोडी विश्रांती घेतली असली तरीही पावसाची संततधार सुरुच आहे. गेल्या 12 तासात, मुंबईत व जवळपास मध्यम ठिकाणी पाऊस पडला. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आयएमडीने दिला आहे. ठाणे आणि मुंबई येथे पिवळा इशारा देण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची एकूण संख्या 4,79,779 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या (Coronavirus Positive Cases) 1,46,305, उपचार घेऊन रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्या 3,16,375 आणि मृत्यू झालेल्या 16,792 जणांचा समावेश आहे.