BSF (PHoto Credits: Facebook)

Coronavirus In BSF: सीमा सुरक्षा दलातील (BSF) 36 जवानांना मागील 24 तासात कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे तर दुसरीकडे कालच्या दिवसभरात कोरोनावर 33 जवानांनी मात केली आहे. आतापर्यंत एकूण 817 जवान हे कोरोना मुक्त झाले असून त्यांना कोविड केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य घडीला एकूण 526 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या संदर्भात सैन्य सुरक्षा दलाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. भारतातील कोरोना बाधितांची संख्या 6 लाखांच्या पार पोहचली असून त्यात दिवसागणित मोठी भर पडत आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू या भागांत सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

कोरोनाच्या लढ्यात डॉक्टरांसोबतच कार्यरत असणाऱ्या पोलिसांमध्ये सुद्धा व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणावर पसरताना दिसत आहे. महाराष्ट्रात पोलीस दलातील 30 पोलिसांना मागील 24 तासात कोरोनाची लागण झाली आहे. तर 4 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पोलिस खात्यातील एकूण 5202 पोलिसांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, भारतात COVAXIN या पहिल्या कोविड 19 लसीला औषध नियामक डीसीजीआय (DCGI) तर्फे I आणि II Phase मध्ये मानवी क्लिनिकल चाचणी साठी मान्यता मिळाली आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत ही लस लाँच होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे.