जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर जी. सी. मुर्मू यांचा राजीनामा; 5 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Aug 05, 2020 11:39 PM IST
आज संपूर्ण भारतीयांसाठी खास आणि अगदी महत्त्वाचा दिवस आहे. करोडो हिंदूंचे स्वप्न असलेले अयोध्या येथील राम मंदिराचे आज भूमिपूजन आहे. आज दुपारी 12.30 वाजता राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्याकडे संपूर्ण भारतवासियांचे लक्ष लागले आहे. यासाठी काल पासूनच दीपोत्सवला सुरुवात झाली. संपूर्ण अयोध्या नगरी सजून नटून भूमिपूजन सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे.
दरम्यान एक दुःखद बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं आज पहाटे पुण्यातील रुग्णालयात निधनात झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांना कोरोना व्हायरसचं लागण झाली असून त्यांनी त्यावर यशस्वीरीत्या मातही केली. परंतु, किडणीच्या आजारानं त्यांचं निधन झालं.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, कोकणात धुव्वाधार पाऊस बरसत आहे. गेल्या 12 तासांत मुंबईच्या पश्चिम उपगनरात 150mm पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान आजही पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबईसाठी रेड अलर्टचा इशारा IMD ने दिला आहे.