Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 28, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 748 वर; आज नवीन 113 रुग्णांची नोंद; 5 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Bhakti Aghav | Apr 05, 2020 11:50 PM IST
A+
A-
05 Apr, 23:50 (IST)

महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्ण संख्या 748 झाली आहे. आज नवीन 113 रुग्णांची नोंद झाली. आज 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, यात 8 जण मुंबईतील, 3 जण पुण्याचे तर प्रत्येकी 1 रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबादचे आहेत. 

05 Apr, 23:31 (IST)

महाराष्ट्र सायबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल पर्यंत, कोविड -19 बद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांविरूद्ध, महाराष्ट्रात 85 खटले दाखल करण्यात आले आहेत. यात बनावट ऑडिओ क्लिप्स, फोटो आणि टिक- टॉक व्हिडिओंचा समावेश आहे.

05 Apr, 23:04 (IST)

रविवारी महाराष्ट्रातील सोलापूर शहरातील विमानतळावर भीषण आग लागली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अहवालानुसार विमानतळाभोवती कोरडे गवत आहे आणि त्यामुळे ही आग वाढत गेली.

05 Apr, 22:50 (IST)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरातील स्थानिक अडचणी व उपयुक्त सूचनांच्या अनुषंगाने, सोमवार दि. 6 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता शरद पवार त्यांच्या https://bit.ly/2UzvZtc या फेसबुक पेजवरून लाइव्हद्वारे संवाद साधणार आहेत.

05 Apr, 22:07 (IST)

हल्दीराम भुजियावाला (प्रतीक फूड प्रॉडक्ट्स) चे मालक महेश अग्रवाल यांचे सिंगापूरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले. ते यकृताच्या गंभीर आजारामुळे त्रस्त होते व गेल्या तीन महिन्यांपासून तिथल्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार चालू होते. 

05 Apr, 21:49 (IST)

दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 9 वाजता त्यांच्या निवासस्थानावरील सर्व दिवे बंद करुन, दीप प्रज्वलित केले. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी त्यांनी जनतेला दिवे पेटवण्याचे आवाहन केले होते.

05 Apr, 21:23 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याचा आवाहनावर मुंबईचे काही खास क्षण टिपले आहेत. मुंबई दिव्यांच्या आरासाने झगमटून उठली असून कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

05 Apr, 21:18 (IST)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  दिवे लावण्याचा आवाहनावर घराबाहेर लावले दिवे लावले आहेत.

05 Apr, 21:03 (IST)

तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याचा आवाहनावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला आहे. तर आता देशातील संपूर्ण नागरिकांकडून कोरोनाचा अंध:कार दूर करण्यासाठी घरातील लाईट्स बंद करुन दिवे लावले जाणार आहेत.

05 Apr, 20:44 (IST)

हरियाणा येथे 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू  झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Load More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल म्हणजेच आज रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन केलं आहे. रात्री 9 वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, नागरिकांनी एकाच वेळी घरातील वीज बंद केल्यास तांत्रिक समस्या निर्माण होऊन यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता आहे, असा इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी देशातील कोरोना बाधितांची संख्या 3113 इतकी होती. यात 2825 सक्रिय केसेस असून 212 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज या आकडेवारीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची संख्या 635 वर जाऊन पोहोचली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

जगभरात कोरोना विषाणुमुळे हाहाकार माजला आहे. जगभरात आतापर्यंत 11 लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 63 हजारपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याशिवाय इटलीमध्ये आतापर्यंत 15 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकतही 3 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


Show Full Article Share Now