मेट्रो स्टेशन वर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली 40 वर्षीय व्यक्तीला अटक
Sexually Assault | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दिल्ली मेट्रो स्टेशन मध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीला महिलेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नाव Manav Aggarwalआहे. तो Kotla Mubarakpur चा रहिवासी आहे. या प्रकारानंतर तो नेपाळला पळून गेला होता आणि अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. दरम्यान हा प्रकार दिल्ली मेट्रोच्या Jor Bagh स्टेशन वर 2 जूनला घडला होता.

Deputy Commissioner of Police (Railways) Harendra K Singh यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जूनला आरोपी नेपाळला पळून गेला होता. पीडीतेने ट्वीट करत सारा प्रकार सांगितला होता. 2 जूनला दिल्ली मेट्रो ने प्रवास करताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एक व्यक्ती जवळ आल्याची ती म्हणाली. त्याला मदत केल्यानंतर ती मेट्रोमधून उतरली आणि कॅब बूक करायला प्लॅटफॉर्मवर बसली. पुन्हा त्या व्यक्तीने पत्ता विचारला. मात्र यावेळेस त्या व्यक्तीने त्याचं गुप्तांग बाहेर काढल्याचा तिने दावा केला. यावेळी पोलिसांनीही मदत न केल्याचा आरोप महिलेचा आहे.

पीडीत महिला गुडगावची रहिवासी आहे. 2 जूनला Huda City Centre ते Jor Bagh Metro Station प्रवास करताना तिला हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार अनुभवायला मिळाला. मेट्रो स्टेशन प्रवासामध्ये त्या व्यक्तीने पीडीतेला दिल्ली विद्यापीठाचा पत्ता विचारला होता. तिच्यासोबत तो व्यक्ती देखील जोर बाग स्टेशन वर उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पाठलाग करायला लागला. या घटनेचे व्हिडिओज सध्या वायरल झाले आहे.

उपलब्ध एका व्हिडिओ मध्ये बेंचवर घडलेला प्रकार दिसत आहे ज्यानंतर महिला चालायला लागली असं दिसत आहे. आरोपी बेरोजगार असून त्याचं पैसा कमावण्याचं साधन रिकामा फ्लॅट भाड्याने देऊन येणारा पैसा आहे. सध्या त्याला अटक करून कोर्टात हजर करण्यात पोलिसांना यश आलं आहे.