अहमदनगर: नगर-दौड महामार्गावर भीषण अपघात; भरधाव गाडीने दिली ट्रक ला धडक
Image used for Representational Purpose | (Photo Credits: ANI)

अहमदनगर (Ahmadnagar) च्या दौड महामार्गावर मध्य रात्रीच्या सुमारास ट्रक आणि गाडीचा भीषण अपघात झाला यात, 4 जणं जागीच ठार झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार यातील तीन जणं नगरमधील भिंगारचे तर एक जण वाळकी येथील रहिवाशी आहे.नगर-दौड महामार्गावरील बाबुर्डी बेंद (Baburdi Bend) जवळच्या महादेव वस्ती जवळ ट्रक आणि कारला अपघात झाला. श्रीगोंदयाहून नगरकडे येताना भरधाव गाडीने ट्रकला मागून टक्कर दिल्याने अपघात झाल्याचे समजले जात आहे. तर, अपघाताची बातमी कळताच जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले (Sandesh Karle) मदतीस धावून आले. आणि सर्वांना जवळच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली. भिंगारचे तिघे जागीच ठार झाल्याने भिंगारवर सध्या शोककळा पसरली आहे.

दुसरीकडे, मागील काही दिवसांपूर्वी नगर-पुणे महामार्गावर दश क्रिया आटपून येताना ट्रक आणि मिनी बसचा अपघात झाला होता. यात बसमधील दोन जण जागीच ठार झाले तर १५ जण जखमी झाले आणि यातील ३ जनाची प्रकृती गंभीर सांगितली जात होती. बसमधील सर्व जण एकाच कुटुंबातील होते आणि आळंदीजवळ दश क्रियेची विधी आटपून परतत असताना जातेगाव फाट्याजवळ अपघात झाला. अपघात झाल्यावर महामार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती. अपघाताबद्दल कळताच सुपा पोलिसांनी मदतीस धाव घेली आणि याबद्दल गुन्हा दाखल केला.