क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्यासाठी मंत्रालयात बैठक; 3 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Prashant Joshi
|
Sep 03, 2020 11:48 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट काही काळासाठी हॅक झाले होते. हे खाते त्याच्या वैयक्तिक वेबसाइटचे होते. या खात्यावर त्यांचे 25 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. खाते हॅक केल्यानंतर हॅकर्सनी बिटकॉईनची मागणी करण्यास सुरवात केली. हॅकर्सनी ट्वीट करून क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये मदत देण्याची मागणी केली. मात्र त्यानंतर ताबडतोब हे खरे रिकव्हर केले गेले.
राजधानी मुंबई येथील आरे कॉलनीमध्ये मेट्रोचे कार शेड होणार नसल्याचा महत्वाचा निर्णय काल घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान अजूनही राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई सारख्या गर्दीच्या शहरामध्ये ही संख्या जरी कमी आली असली तरी, पुणे हे आता नवे हॉटस्पॉट बनले आहे. पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या देखील मुंबईच्या तुलनेत जास्त आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल संध्याकाळी दिलेल्या माहितीनुसार, काल राज्यात कोरोना विषाणूच्या 17,433 रुग्णांची नोंद झाली आहे, तर, 292 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8 लाखांच्या वर गेली आहे. यापैंकी 25,195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात काल 13,959 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 5,98,496 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.48 टक्के आहे. महाराष्ट्रात सध्या 2,01,703 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.