Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
44 minutes ago

आसाममध्ये आढळला आफ्रिकन स्वाइन फ्लू; 7 जिल्ह्यातील 306 गावातील 2,500 डुकरांचा मृत्यू; 3 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Darshana Pawar | May 03, 2020 11:25 PM IST
A+
A-
03 May, 23:25 (IST)

राज्य पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लू आढळला आहे. यामुळे 7 जिल्ह्यातील 306 गावातील 2,500 डुकरांचा मृत्यू झाला आहे.

03 May, 22:52 (IST)

धारावी येथील अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती , एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

03 May, 22:20 (IST)

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे जाळे पसरत चालले आहे. यातच महाराष्ट्रातील नागरिकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात आज 678 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

03 May, 21:23 (IST)

परराज्यातील आपल्या राज्यात परत जाण्यासाठी 505 रुपये आकरले जात आहेत. हे अन्यायकारक असून केंद्र सरकारने परराज्यातील मजूर प्रवाशांच्या तिकिटांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून पैसे द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्राचे मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. तसेच मजुरांच्या तिकिटांसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या 5 लाखांची मदत केली असल्याचे त्यांनी सागितले आहे. एएनआयचे ट्वीट

 

03 May, 20:58 (IST)

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात तसेच राज्यात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मुंबईत सुरू असलेल्या बंदमुळे आंब्यांची विक्री घटली आहे. त्यामुळे आंबे व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहेत. बाजारापेठामध्ये ग्राहक नसल्याने आंब्यांची विक्री होत नाही. त्यामुळे आंबे सडत असल्याचं आंबा व्यापारी अब्दुल मलिक अन्सारी यांनी म्हटलं आहे.

03 May, 20:52 (IST)

मुंबईमध्ये कंटेन्टमेंट झोन असल्यामुळे मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांसाठी कोणतीही रेल्वे सोडण्यात येणार नाही असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

 

03 May, 20:19 (IST)

मुंबईमध्ये आज 441 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8613 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 343 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय आतापर्यंत 1804 जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 

 

03 May, 20:10 (IST)

धारावीत आज 94 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 590 वर पोहोचली आहे.

 

03 May, 19:31 (IST)

दिल्लीतील 25 BSF जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आतापर्यंत दिल्लीत 42 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

03 May, 19:22 (IST)

रेडझोनमध्ये शासकीय कार्यालये ही पूर्वीप्रमाणे ५ टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. तसेच ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये 33 टक्के कर्मचाऱ्यांसह खासगी व शासकीय कार्यालये सुरू राहतील.


 

Load More

कोरोना व्हायरसचे गंभीर संकट देशावर ओढावले असताना आपला जीव पणाला लावून कोरोना योद्धा लढत आहेत. अवितर काम करत आहेत. यात पोलिस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, जीवावश्यक आणि अत्यावश्यक सेवा पुरवाऱ्या सर्वांचाच समावेश आहे. या सर्वांच्या सन्मानार्थ भारतीय हवाई दल आज (3 मे) हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करणारं आहेत. मुंबईतील KGH, KEM, JJ आणि INHS या चार हॉस्पिटल्सवर हा पुष्पवर्षाव केला जाणार आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसचा कहर भारतात वाढत असून देशातील कोरोना बाधितांची संख्या 37 हजारावर पोहचली आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन 2 आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. 37 हजारांपैकी 12 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे ही गंभीर परिस्थिती हाताळणे सुसह्य व्हावे यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन झोनमध्ये नव्याने विभागणी करण्यात आली आहे. रेड झोनमधील बंधने कायम राखत ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसंच कंटेनमेंट झोनसाठी विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

लॉकडाऊनमुळे देशातील विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी सरकारने विशेष श्रमिक ट्रेन्सची सोय केली आहे. त्यापैकी काही ट्रेन्स आपल्या इच्छित स्थळी पोहचल्या आहेत. तसंच अडकलेले विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यंटक यांना देखील आपल्या घरी परतण्याची मुभा देण्यात आली आहे.


Show Full Article Share Now